मेष : स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार कराल
आर्थिक स्थैयासाठी तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा तुम्ही विचार करु शकता. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. कोर्ट-कटेरीच्या खटल्यातून सुटका होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. देण्या- घेण्याचे प्रश्न सुटतील.
कुंभ : कौटुंबिक वाद दूर होतील
आज कुटुंबातील वाद दूर होतील. जोडीदारासोबत आज तुम्ही मजा-मस्ती कराल. राजकारणातील मदतीमुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नतिची शक्यता आहे.आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावध राहा. सामाजिक कार्यातून प्रसिद्धी मिळेल.
मीन: रागावर नियंत्रण ठेवा
मुलांच्या वागण्यामुळे तुम्ही चिंतित राहाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हाला नुकसान होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज
आज विद्यार्थ्यांचे चित्त थाऱ्यावर नसेल. संपूर्ण दिवस तुम्ही कामात व्यग्र राहाल. अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभाचे संकेत आहेत.
मिथुन: डोळे आणि डोके दुखी संभवते
आज तुम्हाला डोळे किंवा डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी आज संबंध चांगले राहतील. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
कर्क: आजचा दिवस शुभ
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.आज प्रियकराशी भेट होण्याची शक्यता आहे. दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. कोणत्यातरी गोंधळामुळे आज तुम्हाला व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनानंतर अडचणी सुटू शकतात. आज प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल ही भेट तुम्हाला लाभदायक ठरेल. बाहेर जाण्याचे योग आहेत.
सिंह: स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल
स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्य्थांना यश मिळेल. मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास यश मिळेल. व्यावसायिक भागीदारीमध्ये फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या
कन्या : महाग वस्तूचे नुकसान संभवते
कोणत्यातरी महागड्या वस्तूचे नुकसान झाल्यामुळे ताण वाढेल. नाहक खर्चावर आवर घाला. उत्पन्न कमी झाल्यामुळे तुम्ही चिंतीत राहाल. कुटुंबातील समस्या मित्रांच्या मदतीने सुटतील. बिघडलेली कामे मार्गी लागतील. संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल.
तूळ : मन आनंदी राहील
आरोग्याच्या कुरबुर कमी होईल. नवे काम मिळाल्यामुळे मन आनंदी असेल. कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याची संधी मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. नोकरीमध्ये प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत.
वृश्चिक : मित्रांची साथ मिळणार नाही
गरजेच्यावेळी मित्रांची साथ मिळणार नाही. खासगी आयुष्यात वेळ देण्याची गरज. करिअर संदर्भातील निर्णय आज घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. राजकाराणात फायदा होऊ शकतो. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
धनु : नकारात्मक विचारांचा वाढेल प्रभाव
नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या आयुष्यात वाढेल. मुलांना आजारपण येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास होऊ शकतो. मित्र- मैत्रिणींच्या मदतीमुळे उत्पन्नाचे नवे स्रोत मिळेल. महत्वाचे काम यशस्वीरित्या पूर्ण कराल.
मकर: आर्थिक विवंचनेतून बाहेर पडाल.
आज तुम्हाला महागडी भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला मदत कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल