मेष – मौल्यवान वस्तू भेट मिळेल
आज तुम्हाला तुमच्या आईवडीलांकडून एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळेल. विनाकारण खर्च करू नका. वाहन चालवताना सावध राहा. कुटुंबासोबत वेळ आनंदात घालवा.
कुंभ – फ्रेश वाटेल
आज दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थांना मदत कराल.
मीन- कौटुंबिक तणाव वाढेल
आज तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत असलेल्या नाते घरातील लोकांना आवडणार नाही. तणाव वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा. मित्रांशी भेट होईल.
वृषभ – मन निराश होईल
आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल. मनात निराशेचे विचार येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढेल. खर्च वाढणार आहे. आर्थिक बाजू मजबूत असेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
मिथुन – मनात आनंदाची भावना निर्माण होईल
आज सर्वजण घरात असल्यामुळे मनात आनंदाची भावना निर्माण होईल. नवीन संबंधामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता आहे. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. पैसे रखडण्याची शक्यता आहे.
कर्क – व्यवसायावर परिणाम होईल
आज तुमच्या सौंदर्यप्रसाधनाच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमवाल. व्यवसायासाठी प्रवास करण्याचा विचार करू नका. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे.
सिंह – धनप्राप्तीचा योग आहे
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्तीमधून धनलाभ होणार आहे. मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. बिघडलेली कामे पुन्हा दुरूस्त होतील.
कन्या – परदेशी जाणे रद्द होईल
आज तुम्हाला व्यवसायासाठी परदेशी जाणे रद्द करावे लागणार आहे.जुन्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. घरात राहिल्यामुळे नाते सुधारण्याची संधी मिळेल. गरजेनुसार पेैसे खर्च करा.
तूळ – तणाव वाढण्याची शक्यता आहे
आज एखाद्या अज्ञात भितीमुळे तुमच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होईल. तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. व्यवहार करताना सावध राहा. प्रिय व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधाल.
वृश्चिक नातेसंबंध सुधारतील
आज तुमच्या चांगल्या वागण्यामुळे नातेसंबंध सुधारणार आहेत. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
धनु – युवांना यश मिळण्याची शक्यता
इंटरनेटवर नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. प्रिय व्यक्तीशी फोनवरून संपर्क साधाल.
मकर – मुलांवर विनाकारण पैसे खर्च होतील
आज खर्च कमी करण्याच्या विचारांमुळे स्वस्त वस्तू खरेदी करू नका. पश्चाताप सहन करावा लागेल. कोर्ट कचेरीत अडथळे येतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. रचनात्मक कार्यात रस वाढेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’