मेष : प्रयत्न वाढवा
एखादे महत्त्वपूर्ण कार्य जर अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढविले पाहिजेत. यश नक्की मिळेल. एखाद्याविषयी मनामध्ये वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. त्यातच तुमचा फायदा आहे. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचा लाभ घ्या.
कुंभ : विरोध होईल
नेहमीच आपल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडत नसतात. कधी कधी विरोधही होतो. मात्र तो अनोळखी लोकांकडून झाला तर जास्त विचार करायला लावणारा असतो. आज तुम्हाला विरोध होणार असून त्याने तुम्ही विचलित होऊ शकता. आरोग्य थोडं नरम-गरम राहिल. म्हणून काळजी घ्या.
मीन : टिका नको
जो प्रशंसा करु शकत नाही, त्याला टिका करण्याचा अधिकार नाही. असा जर तुमचा स्वभाव असेल तर आज तुम्ही दुस-यांवर टिका अजिबात करु नका. नुकसान होऊ शकतो. मानसिक तणाव जाणवत असेल तर आज मनोरंजनासाठी वेळ काढा. आध्यत्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो.
वृषभ : संगीत ऐका
संगीत हे तणाव घालविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून आज जर तुम्ही कुठल्या तणावात असाल तर संगीत ऐकण्यात वेळ घालवा. आयुष्याबद्दल सखोलपणे विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची आवश्यकता लागेल. एकांतात जाऊन चिंतन करा. त्यातून नवीन मार्ग सुचतील. आज कुणाविषयीही तडका-फडकी शेरेबाजी नको.
मिथुन : अतिविचार घातक
कुठल्याही गोष्टीवरील अतिविचार हे घातक ठरु शकतात. कारण त्यातून चिंता व भीती उत्पन्न होत असते. म्हणून चिंता नव्हे तर चिंतन करण्यावर भर द्या. कुणाशीही बोलतांना अचुक संवाद साधा. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. आज विनाकारण एखाद्यावर राग येऊ शकतो. म्हणून रागाला नियंत्रणात ठेवा.
कर्क : आत्मविश्वासाने परिपूर्ण
आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. त्यामुळे आज धाडस करुन अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्या. कुठल्याच गोष्टीची चिंता करु नका. विचार करीत असाल तर चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून नवीन मार्ग सापडतात. झटपट कुठलीच गोष्ट मिळत नाही. पैसा तर अजिबात नाही. म्हणून त्याच्या मागे लागू नका.
सिंह : गप्पा नकोत
आज फुकटच्या गप्पा-टप्पा अजिबात नकोत. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, अशी तुमची अवस्था व्हायची. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. नाही तर हस्ती गेला आणि शेपूट राहिले असे होईल. जेष्ठांचा, गुरूंचा आशीर्वाद मिळविण्याची प्रयत्न करा.
कन्या : कागदपत्रे सांभाळा
आपली महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. कधीही त्यांची गरज पडू शकते. त्यामुळे गरज पडेल त्यावेळी शोधाशोध नको. कर्मचा-यांसाठी आज आनंदाचा दिवस असेल. कारण सुयोग्य कर्मचा-यांना आज बढती मिळू शकते. काही अनोळकी लोकांकडून होणारा विरोध हा लक्ष विचलित करु शकतो.
तूळ : व्यस्त दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त राहण्याचा असेल. तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. त्यामुळे अपूर्ण असलेल्या कार्याच्या पूर्णत्वासाठी आजच्या दिवसाचा लाभ करुन घ्या. तुमच्या घरात जर वारसा हक्काच्या संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्यासाठी शक्यता आहे. त्यामुळे सामंजस्याची भुमिका घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : कंटाळा येईल
आज तुम्हाला कामाचा कंटाळा येणार आहे. त्यामुळे तुम्ही जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न करणार आहात. जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज तुम्हाला मदत मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. मात्र थोडा आत्मविश्वास कमी राहिल.
धनु : सुरुवात करा
मार्ग सापडत नाही म्हणून निपचितपणे एका ठिकाणी बसून राहणे योग्य नाही. तुम्ही चालायला सुरुवात करा, भाग्य तुमच्या मागे आपोआप चालत येईल. प्रयत्नांनीच परमे·ाराची प्राप्ती होत असते. आज तुम्ही अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींचा एकाच वेळी अनुभव करणार आहात. सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या.
मकर : संधीवात वाढेल
संधीवात असणा-यांसाठी आजचा दिवस काळजी करण्याचा आहे. कारण आज त्रास वाढू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. परमेश्वराची आपल्यावर कृपा असल्याची भावना आज मनामध्ये घर करणार आहे. त्यामुळे परमे·ारावरील विश्वास दृढ होईल. एखाद्या इच्छित कार्याला उशीर होऊ शकतो.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र