मेष – प्रवासातून आनंद मिळेल
प्रवास हा कुठल्याही कारणासाठी केला असला तरी त्याचा आपल्याला फायदाच होत असतो. कारण त्यामुळे आपल्याला रोजच्या दिनचर्येतून बाहेर पडण्यासाठी संधी मिळत असते. अशा प्रवासात जर अजुन इतर संधी प्राप्त झाली तर आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. हा आनंद आज तुम्हाला मिळू शकतो. कारण आज तुम्ही प्रवास करणार आहात आणि त्या प्रवासात तुम्हाला संधीही प्राप्त होणार आहे. त्याचा योग्य लाभ करुन घ्यावा. सतत परिश्रम करुन जर यश प्राप्त होत नसेल तर कर्मात बदल करा. आपल्या विचारांची दिशा बदला, प्रयत्नांची दिशा बदला. भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देईल. आज शक्य झाल्यास मनोरंजनासाठीही वेळ काढा.
कुंभ – प्रयत्न वाढवा
एखादं महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल किंवा निराश होऊन तुम्ही प्रयत्न सोडून दिलेले असतील तर आज पुन्हा प्रयत्न वाढवायला हरकत नाही. कारण आज तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं. जोडीदाराशी आज तुमचा मनमुटाव होऊ शकतो. व्यापार व व्यवसायासाठीही आजचा दिवस सुखद असणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी आजच्या दिवसाचा लाभ घ्यायला हवा. आज तुमचे शत्रूही पराभूत होऊ शकतात. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही यश प्राप्त करीत असता. म्हणून आज प्रयत्न करायला किंवा करीत असलेले प्रयत्न वाढवायला चुकू नका. यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
मीन – मनशांती लाभेल
आपल्याला आज भाग्याची चांगली साथ लाभेल. ईश्वराची आपल्यावर अतोनात कृपा आहे ही भावना आज तुमच्या मनामध्ये दाटू शकते. त्यामुळे ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होऊन आज तुम्हाला मनशांती लाभणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यातही आज तुम्ही सहभागी होणार आहात. मनशांती मिळविण्याचा आजच्या काळातील तो सर्वाेत्तम मार्ग आहे. त्यामुळे आज आनंदी आनंद असेल. मुलं मात्र आज तुमच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही. त्यामुळे आजच्या दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले राहिल. आज तुमचा खर्चही होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे तुम्हाला थोडं लक्ष द्यावे लागणार आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त नको.
वृषभ – परिश्रम केल्यावरच भाग्योदय
परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोडीला भाग्याची साथ असेल तरच यश प्राप्त होत असतं. आज मात्र तुम्हाला परिश्रम केल्यानंतरच भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे आज प्रयत्न, परिश्रम करायला चुकू नका. एखादं काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यशाचा आनंद मिळेल. त्यात आज तुमचे शत्रुही पराभूत होणार आहेत. त्यामुळे आनंद द्विगुणीत होऊ शकतो. पारिवारीक संपत्तीचा वाद आपल्या घरात सुरु असेल तर तो आज मिटू शकतो. म्हणून आज त्या दृष्टीने प्रयत्न करायला चुकू नका.
मिथुन- लेखकांना यश मिळेल
आज लेखकांना त्यांच्या लेखन कार्यामध्ये यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आज मान सन्मानही मिळणार आहे. आज थोडीही बेशिस्त नको. बेशिस्त आळसाला जन्माला घालते. तसेच बेशिस्त राहिल्याने आपण जागरुक नसतो. त्यामुळे एक तर आपलं नुकसान होत असतं किंवा एखाद्या मोठ्या फायद्याची संधी आपल्या हातून निसटून जाते. आज एखाद्या कामाला जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे विचलित होऊ नका. आपले प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. आज तुमचे मनस्वास्थही बिघडू शकतं. म्हणून आज आपल्याला जी गोष्ट आवडते ती करण्यावर भर द्या. म्हणजे इतर गोष्टींवर लक्ष देण्यास आपल्याला वेळ मिळणार नाही व आपले मनस्वास्थही चांगले राहू शकते.
कर्क – कार्यात व्यस्त राहाल
आपल्या कामात व्यस्त राहणे ही कधीही चांगली बाब असते. कारण त्यामुळे इतर गोष्टींमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. शिवाय कामावर लक्ष केंद्रित झाल्याने ते काम आपण अधिक चांगल्या पद्धतीने करीत असतो. ईश्वराची आपल्यावर कृपादृष्टी आहे, याचीही प्रचिती आज तुम्हाला येऊ शकते. त्यामुळे ईश्वरावरील विश्वास अजुन दृढ होण्यास मदत मिळेल. आज तुम्ही आध्यात्मिक आनंदही मिळवू शकतात. त्यामुळे आज मनशांतीचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. मात्र आज थोडं मुद्देसुद बोला. व्यर्थ कुणाशी बडबड करु नका. ते ऐकण्याची कोणाची मानसिकता नसेल.
सिंह – अतिआत्मविश्वास घातक ठरेल
आत्मविश्वास ही जगण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, काही तरी मिळविण्यासाठी आवश्यक आवश्यक अशी गोष्ट आहे. मात्र हाच आत्मविश्वास जास्त झाल्यास तो आपल्याला घातक ठरतो. कारण त्यामुळे आपण गाफील राहतो. गाफील राहिल्याने आपलं नुकसानं होतं. आज चिंतन करण्यावरही तुमचा भर असेल. ते करण्यासाठी तुम्ही एकांत शोधण्याचा प्रयत्न कराल. मात्र चिंतनामध्ये कुठल्या समस्येवर जास्त विचार करु नका. तर आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे. यावर मनन करा. तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल.
कन्या – शत्रू पराभूत होतील
जीवन यशस्वीरीत्या जगत असताना आपल्या विचारांचे समर्थक आणि विरोधक हे आपोआप तयार होत असतात. समर्थकांचे आपल्याला सहकार्य मिळतं तर विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे नवीन यश मिळालं की आपल्या विरोधकांचा आपोआप पराभव होतो. त्यापासून मिळणारा आनंद हा मोठा आपण मानतो. हा आनंद तुम्हाला आज मिळणार आहे. कारण आज तुमचे शत्रु पराभूत होणार आहेत. हातात घेतलेले एखादे काम अपूर्ण असेल तर आज प्रयत्न करायला विसरु नका. चिकाटी कायम ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. जोडीदाराचा आज तुमच्यावर प्रभाव राहिल. जोडीदाराच्या इच्छेनुसार आज तुम्ही वागणार आहात.
तूळ – विद्यार्थ्यांनी सावधान रहा
सोशल मीडिया, टीव्ही आज हे व्यसन झाले आहे. त्याचा अतिरेक हा जीवनासाठी, आपल्या प्रगतीसाठी मारक आहे. विद्यार्थ्यासाठी तर ते फारच घातक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी फक्त आजच नव्हे तर कायमस्वरुपी दूर राहावे. नाही तर अब पछताये क्या होत.. जब चिडीया चुन गयी खेत याचा अनुभव तुम्हाला भविष्यात येऊ शकतो. आज प्रवासातून तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकतं. तिचा लाभ करुन घ्या. आज तुम्हाला मित्रही आनंद देतील. त्यांच्यासोबत तुम्ही रममाण होणार आहात.
वृश्चिक – ईश्वराची कृपादृष्टी राहिल
उत्तम संवाद कौशल्य असणं कधीही चांगलं. कारण फक्त बोलघेवडेपणा हा योग्य नसतो. आज तुम्ही तोलून मोलूनच बोललं पाहिजे. आज तुमच्यासाठी हे शिकवणारा दिवस आहे. आज शक्य होईल तितकं मुद्देसुद बोलण्यावरच भर द्या.ईश्वराची आपल्यावर अनंत कृपा आहे, अशीही भावना आज तुमच्या मनात येईल. त्यामुळे ईश्वरावरील विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होईल व आत्मशांतीचा अनुभवही तुम्ही घेऊ शकलो. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद आहे. आज तुम्ही जोड व्यवसायाचाही विचार करु शकता.
धनु – चिंतन करा चिंता करू नका
जीवनात वेळोवेळी चिंतन करायलाच पाहिजे. मात्र त्या चितंनातून नवीन दिशा आपल्याला मिळाली पाहिजे. नाहीतर त्याचे रुपांतर चिंतेत होत असते. चिंता एकदा चिकटली ती आयुष्यभर चिटकलेली असते. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्हीचा अनुभव आज तुम्हाला मिळू शकतो. तो कसा टिकवून ठेवता व त्याचा लाभ कसा घेतला येईल याचा विचार करा. धार्मिक कार्यातुन आज तुम्हाला आनंद मिळू शकतो. मनशांती मिळविण्यासाठी तो आजच्या काळातला सर्वाेत्तम मार्ग आहे. आहाराचे तंत्र बिघडले तर आज तुम्हाला अन्नबाधाही होऊ शकते. म्हणून आहार व आरोग्याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे.
मकर – संतती यश मिळवेल
आपल्या मुलांचं आपल्याला नेहमीच कौतुक असतं. त्यांनी एखाद्या गोष्टी यश मिळवलं तर पालक म्हणून त्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असतो. आज हा आनंद तुम्हाला मिळणार आहे. कारण संततीकडून आज तुम्हाला सुवार्ता कानी पडणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देत राहा. आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. यश मिळवायचे असेल तर परिश्रम करावेच लागतील, याचाही अनुभव आज तुम्हाला मिळू शकतो. म्हणून एखादं काम अपूर्ण असेल तर प्रयत्न सोडू नका. वैवाहिक आयुष्यातील विविध रंगही आज तुम्ही अनुभवणार आहात. त्यामुळे आज आनंदी आनंद असेल.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद