मेष – अपुऱ्या झोपेमुळे त्रास होईल
आज तुमची झोप पूर्ण होणार नाही. नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. मित्रांच्या मदतीमुळे उत्पन्नांचे नवे साधन मिळेल. एखादे महत्त्वाचे मंगल कार्य लवकर पूर्ण करा. यश मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – धनसंपत्तीचा लाभ मिळणार आहे
आज तुम्हाला अचानक धनसंपत्ती मिळणार आहे. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक बदल होतील. आत्मविश्वासात वाढ होईल.
मीन- कामे रद्द होण्याची शक्यता
आज तुमच्या करिअरमध्ये कठीण काळ येण्याची शक्यता आहे. कामे रद्द होतील. पदोन्नतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी नाते मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल
आज तुमच्या भावंडांसोबत दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल. व्यवसाय अथवा नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे.
मिथुन – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्थिती अनुकूल असेल. कोर्ट कचेरीच्या समस्या सुटतील. आत्मविश्वास आणि सामाजिक मानसन्मान वाढेल.
कर्क – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
आज तुमचा वाहनावरील खर्च वाढणार आहे. व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे सध्या टाळा. कौटुंबिक वातावरण भावनिक असेल. वाहन चालवताना सावध राहा.
सिंह – आरोग्य सुधारणार आहे
आज बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. रचनात्मक कार्यात मन रमवाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कन्या – प्रिय व्यक्तीसोबत तणाव जाणवेल
आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला तणाव मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या रूपात वावरणाऱ्या शत्रूंपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ – अचानक धनलाभ होण्याचा योग
आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे.
वृश्चिक – जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. निराश भावनेमुळे अस्वस्थ वाटेल. एखाद्या खास व्यक्तीकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. वाहन चालवताना सावध राहा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
धनु – जोडीदारासोबत मतभेद होतील
आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचे मतभेद होणार आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी भेट होईल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. आरोग्य चांगले असेल.
मकर – कामाच्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता
आज मुलांची चिंता तुम्हाला सतावणार आहे. कामाच्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.