मेष – मौल्यवान भेटवस्तू मिळतील
आज तुम्हाला तुमच्या आई-वडीलांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतील. रखडलेले पैसे परत मिळतील. अचानक प्रवास करावा लागू शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक कामे मिळण्याचा योग आहे.
कुंभ – जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता
आज तुमचे जोडीदाराशी मतभेद होणार आहेत. मित्रांच्या अपेक्षा तुम्हाला निराश आणि दुःखी करतील. विरोधकांपासून सावध राहा. इतरांच्या गोष्टींमध्ये दखल देणे तुमच्यासाठी नुकसानकारक असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
मीन – जुने आजारपण पुन्हा वर येतील
आज तुमचा एखादा जुना आजार पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. राजकारणात सहकार्य मिळेल.सामाजिक कामात रस वाढणार आहे. प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील.
वृषभ – विवाहाचा शुभ योग आहे
अविवाहितांसाठी अनुकूल काळ आहे. विवाहाचासाठी शुभ योग आहे. प्रेम संबंधांसाठी रोमॅंटिक काळ आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन – नवीन कामाला सुरूवात करू नका
आज महत्त्वाचे काम सुरू करू नका. मुलांच्या करिअरची चिंता सतावेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वाद घालण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा.
कर्क – लाभाची नवीन संधी मिळेल
आज व्यवसायात तुम्हाला लाभाची नवीन संधी मिळेल. बिघडलेली कामे सुधारल्यामुळे आनंद मिळेल. नवीन योजना आखाल. वाहन सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत नाते दृढ होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
सिंह – एखादे काम अर्धवट राहील
आज विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची गरज आहे. आळसामुळे तुमची कामे अर्धवट राहू शकतात. तुमच्या प्रिय व्यक्तीमुळे जीवनात सकारात्मक बदल होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
कन्या – सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त व्हाल
आज वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवेल. वाहन चालवताना सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
तूळ – व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे
आज भावंडांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. एखादी सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना यश मिळण्याचा योग आहे
आज विद्यार्थ्यांना ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. देणी-घेणी करताना सावध राहा. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
धनु – आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे
आज विनाकारण गरजेचे खर्च केल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे सध्या टाळा. मन निराश राहण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा.
मकर – आरोग्य उत्तम राहील
आज भाग्याची उत्तम साथ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले असेल. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.जोडीदारासोबत केलेला प्रवास लाभदायक आणि आनंदाचा असेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का