मेष : कोणालाही उधारी देऊ नका
आज कोणालाही उधारी देऊ नका. एखाद्या महागड्या वस्तूचं नुकसान किंवा हरवण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये मन रमेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कायदेशीर प्रकरणांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ : खूप प्रेम मिळण्याची शक्यता
एखाद्या व्यक्तीकडून खूप प्रेम मिळण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुक तरुणांना प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जुन्या संपर्कांमुळे लाभ मिळतील. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य संधी आहे.
मीन : नोकरीमध्ये मिळेल प्रमोशन
आर्थिक दिशेनं केलेले प्रयत्न सफल होतील. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. भाऊ आणि शेजाऱ्यांचं सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल.
वृषभ : बऱ्याच दिवसांनंतर उत्साहित असाल
आज तुम्हाला ताजेतवाने वाटेल. काही नवीन करण्यासाठी मन उत्साहित राहील. जोडीदारासोबत सामाजिक समारंभाचा आनंद अनुभवाल. राजकारणात जबाबदारी वाढू शकतील. बिघडलेली कामे पूर्ण होतील. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : प्रेमात त्रिकोणाची परिस्थिती
प्रेमामध्ये त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या हट्टी व्यवहारामुळे पार्टनर त्रस्त होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहा. व्यावसायिक परदेशी यात्रा होण्याचा योग आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे.
कर्क : महागडी भेटवस्तू किंवा पैसा मिळू शकतो
सासरच्यांकडून महागडी भेटवस्तू किंवा पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रेसाठी अनुकूल वेळ आहे. नवीन योजना सफल होऊ शकते. सुख-सुविधांवर अधिक खर्च होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती शक्यता आहे.
सिंह : धावपळीमुळे अस्वस्थ राहाल
आज तुम्ही निरर्थक धावपळीमुळे अस्वस्थ राहाल.शारीरिक स्वरूपात थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि पैशांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
कन्या : संबंधांमध्ये गोडवा येईल
नात्यांची नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल. व्यवसायात एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे मदत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ : निष्काळजीपणामुळे संधी गमवाल
निष्काळजीपणामुळे तुम्ही चांगल्या संधी गमवाल. वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. तरुण क्रीडा सारख्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. सुखांच्या साधनांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिक मोठे करार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
धनु : नोकरीमध्ये निरर्थक गुंतागुंत
व्यवसायात मेहनत अधिक पण लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निरर्थक गुंतागुंत होण्याची शक्यता आहे. विवाहातील अडचणी दूर होतील. कादेशीर समस्यांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
मकर : आरोग्यासंदर्भात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता
आज दिवसभरात आरोग्यासंदर्भात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे निर्णय घेणे कठीण होईल. धार्मिक कामांमधील विश्वास वाढेल. धन लाभ होण्याची शक्यता.