मेष : आर्थिक ओढताण
आज तुमची आर्थिक बाजु अस्थिर असल्याने ओढताणीचा सामना करावा लागेल. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर असलेले गैरसमज दूर होऊन संबंध आज सुधरु शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न तुम्ही वाढविले पाहिजेत. अतिआत्मश्वास हा घातक असतो. उथळ पाण्याला खळखळात फार. म्हणून सावध राहा.
कुंभ : दुखणे वाढेल
ज्यांना दात दुखीचा त्रास आहे, त्याच्यासाठी आज चिंतेचा व स्वत:ची काळजी घेण्याचा दिवस आहे. कारण आज आपल्या दातांचे दुखणे वाढू शकते. तुळशीला श्रद्धापूर्वक पाणी घाला. शक्य झाल्यास त्याची रोजसाठी सवय करुन घ्या. आज फुकटच्या गप्पा टप्पा नकोत. नाहीतर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी अवस्था होईल.
मीन : मार्ग सापडेल
आज तुमच्यासाठी आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे. कारण आज तुम्हाला यशाचा राजमार्ग सापडू शकतो. त्यामुळे सावध राहून संधीचा फायदा घ्या. मित्रांशी सुसंवाद वाढवा. बिघडलेले संबंध सुदृढ करुन घ्या. मात्र कोणाशीही बोलतांना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. तोलून मोलूनच बोलणे आज आपल्या हिताचे राहिल.
वृषभ : गुंतवणूक सांभाळून
प्रगती करण्यासाठी आज तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर ती सांभाळून व काळजीपूर्वक करण्याचा सल्ला आज तुम्हाला देण्यात येत आहे. व्रत वैकल्याचे पालन करण्यावर भर द्या. आत्मिक शांतता लाभेल. कुणाशीही बोलातांना अचुक संवाद साधा. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही,याची काळजी घ्या.
मिथुन : कौतुक होईल
आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आजच्या तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. त्यामुळे आज तुम्ही आत्मविश्वासानेही परिपूर्ण राहणार आहात. आपल्या व्यस्त अशा दिनचर्येमध्ये मनोरंजनासाठी वेळ काढा. मानसिक शांतता मिळेल. कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा. निर्णय सांभाळून घ्या.
कर्क : संततीला यश
आज तुमच्या संततीला यश मिळू शकतं. त्यामुळे त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचाही अधिकार नसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. शक्यतोवर कुणावरही टिका करुच नका. त्यात संबंध खराब होण्याची शक्यता आहे. वास्तविकता समजून घेण्याचा प्रयत्न करा. मृगजळाच्या मागे लागू नका.
सिंह : तणाव वाढेल
आज परिवारामध्ये विशेषत: पती-पत्नीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भांड्याला भांड लागले तर आवाज होणारच. म्हणून वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. आज तुमचे शत्रु वरचढ होऊ शकतात. त्यामुळे सावध राहा. संपूर्ण लक्ष कामामध्ये गुंतवणून योग्य व महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
कन्या : सामंजस्य वाढेल
घर जर कुठल्या गोष्टीवरुन वाद सुरु असेल किंवा पती-पत्नीमध्ये वितुष्ठ आलेले असेल आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज सामंजस्य वाढीस लागून संबंध सुदृढ होऊ शकतात. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांना दुखापत होऊ शकते.
तूळ : जोडीदाराचा प्रभाव
आज तुम्ही पूर्णपणे जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद दिवसभर राहिल. वेळ असेल तर आज सिनेमा बघायला नक्की जा. करमणूकीची तुम्हाला आवश्यकता आहे. एखाद्या गोष्टीवर आज विनाकारण संताप येऊ शकतो. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : पराक्रम गाजवाल
आज आपला पराक्रम गाजविण्याचा दिवस आहे. आरोग्यामध्ये वृद्धी झालेली आज अनुभवायला मिळेल. दिवसभर ताजेतवाने वाटेल. अनोळखी लोकांपासून सावध राहा. त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे. त्यामुळे दिवसभर सुखशांतीचा अनुभव कराल.
धनु : खेळात यश
खेळाडूंसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. त्यांना खेळामध्ये यश मिळून लौकिकातही भर पडणार आहे. परिवारासाठी मात्र आजचा दिवस चिंतेचा राहिल. कारण घरातील वातावरण थोडं तणावपूर्ण राहू शकतं. तरीही आजचा आपला दिवस हा आनंदी राहण्याचा दिवस आहे. म्हणून परिस्थितीचा जास्त विचार करु नका.
मकर : मुलांकडे दुर्लक्ष करा
आपल्या मुला-मुलींनी नेहमी आपल्या मर्जीनुसारच वागावं हा अट्टहास चुकीचा आहे. किमान तरी तो नको. कारण आज मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. अनोळखी लोकांपासून सावध राहा.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)