मेष : धनलाभाची शक्यता
आज भाग्योदयाचा दिवस आहे. जोडीदाराच्या माध्यमातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये मन लागेल.
कुंभ : पारिवारिक वातावरण सुखद असेल
जुन्या नातेसंबंधांप्रति विशेष भावनांचा अनुभव येईल. कौटुंबिक वातावरण सुखद आणि उत्साहपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत असलेला संघर्ष दूर होईल. व्यावसायिक भागीदारीमुळे फायदा होईल.
मीन : हलगर्जीपणामुळे चांगली संधी गमवाल
स्वतःच्या हलगर्जीपणामुळे एक उत्तम संधी गमवाल. व्यावसायिक प्रवासादरम्यान सतर्क राहा. एखादी अडचण निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादांपासून दूर राहा. प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल.
वृषभ : निष्काळजीपणामुळे काम बिघडण्याची भीती
आज कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे काम बिघडण्याची भीती आहे. वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. मन त्रस्त असेल. मित्रांचं सहकार्य लाभेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळेल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : गुडघे-पाय दुखीचा त्रास होईल
गुडघे किंवा पायांच्या दुखण्यामुळे त्रस्त असाल. दिनक्रमाची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त भार येण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जोडीदाराचा सहवास आणि सहकार्य मिळेल.
कर्क : खास व्यक्तीची भेट
व्यावसायिक करार मित्रांच्या मदतीनं पूर्ण होतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट घडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा भावनिक सहकार्य लाभेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. उत्पन्न आणि खर्चात नियंत्रण ठेवा.
सिंह : विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळेल
विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टामुळे पूर्ण लाभ मिळेल. मार्केटिंगचं काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नव्या व्यावसायिक योजनेमुळे तुमच्यात उत्साह येईल. राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळेल.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
कन्या : आर्थिक संकटाची शक्यता
आयात-निर्यात व्यापाराशी जोडलेल्या लोकांना आर्थिक संकटाच्या परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. कुटुंबाकडून भावनात्मक सहकार्य मिळेल. राजकारणात अधिक आवड निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
तूळ : वडिलांचे आरोग्य सुधारेल
वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. सूर्य स्नान आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती कायम असेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
वृश्चिक: प्रेमसंबंधांत तणाव वाढण्याची शक्यता
प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. अडकलेला पैसा मिळण्याचा योग आहे. धार्मिक कार्यांमध्ये आवड निर्माण होऊ शकते.
धनु : मानसिकरित्या अशांत
आज तुम्ही मानसिकरित्या अशांत राहण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त राहाल. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता. अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
मकर : भेटवस्तू मिळू शकतात
प्रियकराकडून भेटवस्तू मिळू शकतात. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.