मेष : सावध राहा
वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा दुतोंडी व्यक्ती पासून सावध राहा. ते आपलं नुकसान करु शकतात किंवा स्वत:च्या स्वार्थासाठी तुमचा उपयोग करुन घेऊ शकता. आपल्या कल्पक व सर्जनशील कृतीला आज चालना मिळू शकते. त्या कार्यात आज प्रगती होऊ शकते. काही मिळवायचे असल्यास सोसावं लागतंच. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
कुंभ : संकटातून बाहेर पडाल
जीवनात चढ-उतार येतच असतात. म्हणून संकटांना घाबरुन न जाता संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. दैव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती तुम्हाला मिळू शकते. एखाद्या छोट्या नुकसानामुळे मोठा फायदा होणार असेल तर होणा-या नुकसाला गुंतवणूक समजा. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात, हे लक्षात घ्या. आज कार्यात व्यस्त राहाल.
मीन : सावध राहा
वरकरणी कठोर आणि आतून कनवाळू स्वभावाचे तुम्ही असाल तर आज सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैर फायदा घेतला जाऊ शकतो. भुतकाळात घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी घटनेचा आनंद आज पुन्हा लाभू शकतो. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. नाह तर हत्ती गेला नि शेपुट राहिल, अशी परिस्थिती निर्माण होईल.
वृषभ : परिणाम भागावे लागतील
आधी कधी तरी केलेल्या मुर्खपणाची फळे आता वाट्याला येऊ शकतात. त्याचे परिणाम आज भोगावे लागू शकतात. म्हणून “आलीया भोगासी असावे सादर’ या संतोक्तीनुसार ते भोगण्याची तयारी ठेवा. एखाद्या कामाला वेळ जास्त लागु शकतो. म्हणून विचलित होऊ नका. परिश्रम करीत राहा. आज अनपेक्षितपणे अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन : प्रवासात नुकसान
आज तुमचा प्रवासाचा योग असून त्यात नुकसान होण्याचा संभव आहे. त्यामुळे आज शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. चिकाटी कायम ठेवून हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या. त्यात आज यश मिळण्याची शक्यता आहे. थोडा आत्मवि·ाास कमी राहिल. म्हणून विचलित होऊ नका किंवा प्रयत्नांमध्ये कमी पडू नका.
कर्क : प्रवासात संधी
आज तुमचा प्रवासाचा दिवस असून त्यात तुम्हाला संधीही प्राप्त होणार आहेत. म्हणून संधीवर लक्ष ठेवून तिचा लाभ घ्यायला चुकू नका. आज तुमच्या नवीन ओळखीही होऊ शकतात. सकारात्मक राहून त्यांना सामोरे जा. आपल्यावर ई·ाराचे आशीर्वाद आहे, ही भावना आज मनात दाटून येईल. ई·ारावर असलेला वि·ाास त्यामुळे अधिक दृढ होईल.
सिंह : विचार करुन निर्णय घ्या.
आज विशेत: सरकारी कर्मचा-यांनी विचार करुन निर्णय घ्यायला हवा. आज थोडी गोंधळाची स्थिती राहिल. त्यात आपले नुकसान होणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य आज वाढेल. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला चुकू नका. भविष्यात त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आजचा दिवस कलाकारांसाठी यश मिळवून देणारा आहे.
कन्या : लेखन कार्यात यश
लेखक व कवी मंडळींसाठी आजचा दिवस यश मिळवून देणारा आहे. “जे न देखे रवि ते देखे कवी’ नुसार आज आपल्या कल्पनेला, सजृनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. एखाद्या लहान फायद्याच्या मागे लागून मोठं नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आज शक्यतोयवर मुद्देसुत बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करु नका.
तूळ : मित्र आनंद देतील
आज तुम्हाला मित्रांकडून आनंद प्राप्त होऊ शकतो. आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवणार आहात. एखाद्या गोष्टीचे नियोजनही आज केले जाऊ शकते. कामात अडचणी निर्माण होतील. म्हणून हताश होऊ नका. अतिआत्मविश्वास हा घातक असतो. म्हणून त्याला आज आवर घालायला हवा. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, ही बाब लक्षात घ्या.
वृश्चिक : शांतता लाभेल
“मन शांत तर सर्व मस्त’ याची अनुभूती आज तुम्ही घेऊ शकतात. कारण आज मानसिक सुख शांततेचे वातावरणाचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. मात्र असे असतानाही एखाद्या गोष्टीवर विनाकारण आपला संताप येऊ शकतो. म्हणून लाभलेली शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस कलाकारांना यशदायक ठरणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा.
धनु : आर्थिक ओढताण होण्याची शक्यता
आर्थिक ओढतानीचा सामना आज तुम्हाला करावा लागू शकतो. दात आहेत तर चने नाहीत आणि चने आहेत तर दात नाहीत, अशी तुमची आज अवस्था होऊ शकते. म्हणून परिस्थिती स्विकारुन शांत राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता आज तुम्हाला लाभेल. चिंतन करण्यावर भर द्या. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आनंद मिळू शकतो.
मकर : जबाबदारी टाळाल
कामात आज मन लागत नसल्याने कामे, जबाबदारी टाळण्याकडे तुमचे लक्ष राहिल. न कत्र्याचा वार शनिवार असतो. म्हणून ते करु नका. एखादं महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. कदाचित ते आज पूर्णही होऊन आनंद प्राप्ती होऊ शकते. आज तुम्ही अमर्याद सहनशिलता व उत्साहाने परिपूर्ण राहणार आहात. त्याचा योग्य तो लाभ करुन घ्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद