मेष : मुलांमुळे व्हाल चिंताग्रस्त
आज तुम्ही मुलांमुळे चिंतेत असण्याची शक्यता आहे. आज व्यवसायात किंवा कुटुंबात तणाव जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे साथ आणि सानिध्य मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नति मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या.
कुंभ:नोकरीत पदोन्नति होईल
आज तुम्ही आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसा, सन्मान आणि यश यांमध्ये वाढ होईल. काही काम वेळेवर होताना दिसतील. नोकरीमध्ये पदोन्नति होईल.सुख- सुविधा आणि इतर चैनींच्या वस्तूंमध्ये वाढ होईल. कुटुंबातील जीवन सुखकारक राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील.
मीन: कुटुंबाचे सहाकार्य लाभेल
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. करिअर घडवण्यासाठी तुमची चांगली कार्यप्रणाली आणि व्यवहारात बदल करा. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आवश्यक कामे पूर्ण करा. अडकलेली पैसा परत मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : कौटुंबिक अडचणी सुटतील
कौटुंबिक अडचणीत घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याने प्रश्न सुटतील. नव्या ओळखी होतील. गरजूंना मदत करा. सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसाअडका वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. समाजोपयोगी कामात व्यग्र राहाल. व्यावसायिक यात्रा होण्याची शक्यता आहे.
मिथुन: आजचा दिवस तुमचा
आज दिवस तुमचाच आहे कारण तुमचे नशीब तुमची साथ देणार आहे. तरुणांना करिअरचे अनेक पर्याय मिळतील. समोर आलेल्या अडचणी सोडून कामावर लक्ष द्या. यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नव्या ओळखीचा फायदा होईल. व्यवसायात राजकारणी व्यक्तिची मदत मिळेल. प्रवासाचे योग आहेत. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होईल.
कर्क : नव्या कामाची सुरुवात करु नका
आज कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करु नका. डॉक्टरांवर पैसा खर्च करण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. भांडणांपासून दूर राहा. अडकलेली कामे पूर्ण होतील. राजकारणात तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. प्रवासाचे योग आहेत.
सिंह : आज मन शांत आणि आनंदी राहील
आज तुमचे मन शांत आणि आनंदी राहील.जुन्या आजारापासून सुटका होईल. कुटुंब आणि समाजात तुमचे मान सन्मान वाढेल. नव्या लोकांशी भेट होतील, ज्याचा फायदा तुम्हाला व्यवसायात होईल. विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल. जोडीदारासोबतचे संंबंध अधिक दृढ होतील
कन्या: कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता
कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी बोलताना स्वत:वर संयम ठेवा. कारण भांडण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कामात आस्था वाढेल. व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधान
तूळ : आज मन उदास राहील
आज मन उदास आणि अस्वस्थ राहील. सतत चिडचिड होईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येतील. एखादी व्यावसायिक योजना पूर्ण होईल. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावध राहा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : पैशांसंदर्भात आनंदवार्ता मिळेल.
आज भागीदारीत नवे काम सुरु करण्याची योजना आखाल. पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. व्यावसायिक दौरा फायद्याचा ठरेल.यात्रेदरम्यान थोडे सतर्क राहा. आरोग्य चांगले राहील.
धनु : अचानक झालेली भेट नात्यात आणेल बदल
कुटुंबातील काही अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी झालेली अचानक भेट नात्यात बदल आणू शकते. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल.
मकर: टाळाटळ करण्याची सवय ठरेल घातक
प्रत्येक गोष्ट टाळण्याची तुमची सवय आज तुमच्या करिअरसाठी घातक आहे. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम न मिळाल्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल.अधिकाऱ्यांकडून तुमच्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. घेण्यादेण्याच्या बाबतीत सावध राहा. कोर्टकचेरीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
हेही वाचा
कोणत्या राशीच्या लोकांना येतो पटकन राग
राशीनुसार व्यक्त करण्याची पद्धत असते वेगळी
आपल्या राशीनुसार करुन पाहा या सेक्स पोझिशन