मेष : कागदपत्रे सांभाळा
महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित जागेवर सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करा व त्यांना सांभाळून ठेवा. रक्तदाबाचा त्रास असल्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चिंता करु नका. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.
कुंभ : चिकाटी ठेवा
एखादे काम पूर्ण व्हायला वेळ लागत असेल तर समजून घ्या की भाग्य तुमची परिक्षा घेत आहे. त्यामुळे चिकाटी कायम ठेवून हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. वडीलांकडून मार्गदर्शन मिळेल. स्वत:च्या कामामध्ये त्याचा उपयोग करुन घ्या. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा.
मीन : आर्थिक ओढताण
उत्पन्नापेक्षा खर्च झाला की आर्थिक ओढताण होतच असते. दात आहेत तर चणे नाहीत आणि चने आहेत तर दात नाहीत, याचा अनुभव येईल. आपल्या घरात जर पैतृक संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज प्रयत्न वाढवा. तो वाद मिटण्याची शक्यता आहे. स्त्रियांना आज मानसिक तणाव जाणवेल. आपल्या आवडत्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : आशीर्वाद मिळवावेत
गुरुजन किंवा जेष्ठांचे आशीर्वाद, त्यांचे मार्गदर्शन हे नेहमी उपयोगाचे असते. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवा व मार्गदर्शनाचा आपल्या कामात उपयोग करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परिक्षेच्या विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस फारच उत्तम आहे. स्त्री पक्षाकडून आपल्याला आज सहयोग मिळणार आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात.
मिथुन : प्रयत्न वाढवा
एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल किंवा अधिका-याच्या हातात अडकलेले असेल तर आज प्रयत्न वाढवायला हवेत. यश नक्की मिळू शकतं. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले अशी अवस्था होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आपल्या आरोग्याची आज विशेष काळजी घ्यावी. त्रास वाढू शकतो. कुटुंबातील कोणताही निर्णय धर्याने घ्या.
कर्क : गोंधळ उडेल
आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आज तुमचा गोंधळाचा दिवस राहणार आहे. विशेषत: सरकारी कर्मचारी आज गोंधळलेल्या स्थितीत असतील. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा. रक्तदाबाचा त्रास असलेल्या आपल्या आरोग्याची आज विशेष काळजी घ्यायची आहे. जोडीदारासोबत तुम्ही प्रवासाचा आनंद घेणार आहात.
सिंह : अभ्यासात लक्ष
यश मिळवायचे असेल तर विद्याथ्र्यांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासात द्यायला हवे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर कळ काढावीच लागेल. आरोग्य थोडं नरम-गरम राहिल. थोडी कणकण जाणवू शकते. कुटुंबवत्सल लोकांना आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरात आनंदी आनंद असेल.
कन्या : आशीर्वाद मिळवावेत
गुरुंच्या आशीर्वादाची तुम्हाला नितांत गरज असून आज ते मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. आत्मशांतीचा अनुभव कराल. आहारावर लक्ष देऊन पथ्य सांगितलेले असतील तर त्यांचे तंतोतं पालन करा. नाही तर त्रास होऊ शकतो. सासुरवाडीकडून आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवारात आनंदाचे वातारवण राहिल.
तूळ : गोंधळ उडेल
आज विशेषत: सरकारी कर्मचा-यांचा गोंधळ उडणार आहे. वरीष्ठांची नाराजीही ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय किंवा काम विचारपूर्वकच करा. तुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थआहे. आज तुम्हाला मित्रांकडून आनंद प्राप्त होणार आहे.
वृश्चिक : सोशल मीडिया घातक
सोशल मीडियाचा वाढता वापर हा संपूर्ण समाजासाठी मोठी समस्या झालेला आहे. किमान विद्यार्थ्यांनी तरी त्यापासून लांब राहिलेलेच बरे. नाही तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. आज आपल्या संततीला यश मिळणार आहे. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्या. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज तुम्हाला बघायला मिळतील.
धनु : कामे टाळाल
आज आळस जाणवेल. त्यामुळे कामे टाळण्याकडे कल राहिल. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आपल्या संततीला आज यश मिळणार आहे. त्याचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणून वाद वाढवू नका. सामंजस्याची भूमिका घ्या.
मकर : लालस नको
लालच बुरी बला होती है. त्यात लालसा जर झटपट पैसे मिळवायची असेल तर ती कधीही वाईटच. आपला प्रवास वाईट मार्गाने होणार नाही, याची काळजी घ्या. वडीलांशी आज तुमचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आपली चुक तर नाही ना? हे ही शोधा. घरातील शितयुद्ध वेळीच थांबवा.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र