मेष – अचानक धनलाभ होईल
आज सासरच्या मंडळींकडून अचानक एखादी मौल्यवान वस्तू अथवा धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल. व्यवसायातील योजना सफळ होतील. राजकारणात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ – आरोग्यात सुधारणा
आज तुम्हाला आराम आणि चिंतनासाठी वेळ मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल.आहाराबाबत सावध रहा. फ्रेश होण्यासाठी प्रवास करा. मानसिक स्वास्थ चांगले असेल. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. देणी-घेणी करताना सावध रहा. बोलताना सावध रहा.
मीन – जोडीदाराशी मतभेद होतील
इतरांच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. विचार वेगवेगळे असल्याने नातेसंबध दुरावतील. रखडलेली कामे पूर्ण कराल.आर्थिक स्थिती मजबूत राहील. देणी-घेणी सांभाळून करा. वाहन चालवताना सावध रहा.
वृषभ – दिवस दगदगीचा असेल
आज तुम्हाला दिवसभर धावपळ करावी लागेल. उतावळेपणा करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. देणी-घेणी सांभाळून करा. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. बिघडेलेली कामं पुन्हा पूर्ववत होऊ शकेल.
मिथुन – मित्रांची साथ मिळेल
विरोधकांना समजावून काम पूर्ण करू शकाल. मित्रांची साथ मिळेल. भावंडांमधील कटूपणा कमी होईल. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा.
कर्क – अधिकाऱ्यांशी वाद होतील
कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आत्मविश्वासाने काम करा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सामाजिर कार्यात व्यस्त रहाल. राजकारणातील जबाबदारी वाढेल. विरोधक त्रास देतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
सिंह – एखादी नवीन संपत्ती खरेदी कराल
आज धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. नवीन संपत्ती खरेदी कराल. मेहनतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक प्रतिष्ठ आणि धनामध्ये वाढ होईल. स्वार्थी आणि कपटी लोकांपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – विद्यार्थ्यांचे मन भटकेल
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटणार नाही. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. अचानक एखादं नवं प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा ताण वाढेल. वाहन चालवताना सावध रहा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.
तूळ – जोडीदाराची तब्येत बिघडेल
जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन अशांत होईल. आत्मविश्वास कमी राहील. वादविवादांपासून दूर रहा. विरोधक त्रास देतील. सावध रहा. आर्थिक स्थिती चांगली असेल. मित्रांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – कुटुंबकलह वाढतील
कुटुंबात भांडण होण्याची शक्यता आहे. मनातील गोष्टी बोलून मोकळं व्हा. नवीन ओळखी वाढतील. एखाद्या सहकाऱ्याबाबत प्रेमभावना निर्माण होतील. व्यवसायात भागिदारीचा फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सुखवस्तूंमध्ये वाढ होईल.
धनु – विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश
विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळेल. मनाप्रमाणे नोकरी मिळाल्याने आनंदी व्हाल. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. राजकारणात व्यस्त रहाल. देणी-घेणी सावधपणे करा. कुटुंबात सुख नांदेल. परदेशी जाण्याचा योग आहे.
मकर- खर्च वाढेल
आज तुमचा खर्च नेहमीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. व्यवसायात मेहनत जास्त आणि फळ कमी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. राजकारणात जबाबदारी वाढेल. जोडीदारासोबत नातं मजबूत होईल.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी