मेष – मन उत्साहित राहील
आज तुम्हाला फ्रेश आणि उत्साहित वाटेल. नवीन कामे करण्याचा उत्साह वाटेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
कुंभ – रखडलेली कामे पूर्ण होतील
आज तुम्हाला नव्या योजना सुरू करणे सोपे जाईल. रखडलेली कामे पूर्ण करणे कठीण जाईल. जोडीदारासोबत धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
मीन – मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता
आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. धोका मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे सर्वात आधी पूर्ण करा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ – जोडीदाराचा तणाव वाढेल
दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरूवात करा. विरोधकांपासून सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मिथुन – शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता
आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. राजकारणातील सक्रीयता वाढण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा.
कर्क – वाहनसुख मिळेल
वाहनसुखात वाढ होईल. जोडीदार अथवा मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. राजकारणातील ओळखींचा फायदा होईल. प्रेमाचा शोध पूर्ण होईल.
सिंह – कौटुंबिक बाजू मजबूत होईल
जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. कौटुंबिक बाजू मजबूत होईल. व्यवसायात त्रिकोणीय भागिदारी आणि नातेसंबंधातून लाभ मिळेल. देणी घेणी सांभाळून करा.
कन्या – व्यवयासात समस्या येण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी अथवा कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ उतार जाणवतील. वादविवादांपासून दूर राहा. राजकीय जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्याी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील.
तूळ- चल अथवा अचल संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस घेणे लाभदायक ठरेल. भावनेच्या आहारी जाण्यामुळे निर्णय बदलावा लागेल. परदेशी प्रवासाला जाण्याचा योग आहे.
वृश्चिक – एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता
आज दुर्लक्षपणा अथवा आळसामुळे तुम्ही एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. कामात उशीर झाल्यामुळे तणाव वाढेल. खोटं बोलून तुमची वैयक्तिक कामे करून घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती चांगली राहील.
धनु – आईची तब्येत खराब होईल
आईची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. मन निराश आणि असमाधानी असेल. जोडीदाराशी भावनात्मक सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. प्रवासाला जाणे टाळा. देणी घेणी सांभाळून करा.
मकर – कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल
आज तुम्हाला व्यवसायासाठी कुटुंबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांंना अभ्यासाची आवड निर्माण होईल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी