मेष – व्यवसायात प्रगती
आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात विस्तार होण्याची संभावना. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक कार्याचं आयोजन करण्याची तयारी सुरु होईल. कुटुंबासह तुम्ही वेळ घालवू शकाल. आई – वडिलांचा पाठिंबा लाभेल. आरोग्याची योग्य काळजी घ्या.
कुंभ – आरोग्यामध्ये सुधारणा होईल
आज तुम्हाला शुभ संकेत जाणवतील. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत तुमची काळजी मिटेल आणि आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या खासगी आयुष्यात कोणाबद्दल असलेले गैरसमज कमी होतील. नात्यामध्ये मधुरता जाणवेल. व्यापारामध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमची प्रशंसा होईल. रचनात्मक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. मित्रांबरोबर प्रवास करण्याचा बेत आखाल.
मीन – जोडीदाराबरोबर भांडण होण्याची शक्यता
तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये निराशा मिळणाचेदेखील संकेत आहेत. कार्यालयात तुमची बदली झाल्याचा तुम्हाला फायदा होईल. कोणत्याही नव्या कामाला सुरूवात करू शकता. कायद्याने तुम्ही वाद सोडवू शकता. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. यात्रेचा योग आहे.
वृषभ – शारीरिक थकवा जाणवेल
शारीरिक थकवा जाणवण्याची आज शक्यता आहे. कामामध्ये तुमचं मन लागणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक नात्यामध्ये येणारा कडवटपणा आज दूर होईल. कार्यालयात तुमच्यावर जबाबदारी आल्याने कामात वाढ होईल. रखडलेले पैसे आज मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
मिथुन – भावाबहिणीचे संबंध आज सुधारतील
तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध आज सुधारतील. विशेषतः लहान भाऊ आणि बहिणीतील संबंध सुधारतील. तुम्हाला आज तुमचं भाग्य चांगलीच साथ देईल. आरोग्याच्या बाबतीत ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. व्यावसायिक लाभ होतील. रखडलेले पैसे मिळतील.
कर्क – व्यवसायात तुम्हाला तोटा होऊ शकतो
आज कामात सावधानता बाळगा. तुमच्या व्यवसायात तुम्हाला तोटा होण्याचा संभव आहे. पैशांची देवाणघेवाण आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्कता बाळगा. विरोधक तुमच्या प्रतिष्ठेला काळिमा फासण्याचा संभव आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. कुटुंबात सुखशांती समाधान लाभेल. शांत राहून आपल्या कामावर लक्ष द्या.
सिंह – पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता
तुमचं पद, प्रतिष्ठा आणि पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वेगळ्या स्रोताकडून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता असते. कौटुंबिक जीवनात सुखशांती लाभेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. तणाव दूर होईल. राजकारणात जबाबदारी वाढू शकते.
कन्या – आर्थिक नुकसान होऊ शकतं
आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन खराब होऊन खर्च वाढू शकतो. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. तुमचं बजेट बिघडू शकतं. नोकरीमध्ये जबाबदारी पूर्ण करण्यात त्रास वाढू शकतो. धैर्याने काम करा. तुमच्या प्रिय व्यक्तीव्यक्तीबरोबर भेट घडू शकते.
तूळ – छातीमध्ये त्रास वा गॅसची समस्या उद्भवू शकते
आज तुम्हाला छातीमध्ये त्रास अथवा गॅसची समस्या उद्भवू शकते. तुमच्या योजना असफल होऊ शकतात. जोडीदाराबरोबर संबंध सुधारतील. सामाजिक पातळीवर तुम्हाला सक्रिय राहण्याची गरज आहे. व्यवसायात भागीदारामध्ये लाभ होईल. कागदपत्रांची कामं योग्य तऱ्हेने करा.
वृश्चिक – मुलांकडून आनंद मिळेल
तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. तुमचं मनोबल वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणींशी भेट होण्याची शक्यता. तुमचे बिघडलेले संबंध आज सुधारतील. तुमच्या कामामध्ये वेग येईल. पैशांसंबंधी असलेले त्रास दूर होतील. आरोग्य आणि प्रतिष्ठा सांभाळा.
धनु – सध्याची नोकरी फायदेशीर ठरू शकते
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबच काही सामाजिक कार्यामध्येदेखील सहभागी व्हावं. नोकरीमध्ये वरिष्ठांशी बोलाचाली फायदेशीर ठरू शकते. व्यापारात नावीन्य येईल. भविष्यात फायदा होईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाण्याचा बेत बनू शकतो. रचनात्मक कार्यात तुमचं मन लागेल.
मकर – आर्थिक नुकसान होईल
योग्य विचार करून गुंतवणूक करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. आरोग्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. मित्रांबरोबर वेळ घालवता येईल. रखडलेली कामं पूर्ण होतील.