मेष – प्रेम संबधांमध्ये तणाव
प्रेमसंबधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. तुमचा उदार स्वभाव कधी कधी त्रासदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीमध्ये वाद होऊ शकतात. रचनात्मक कामात लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे.
कुंभ – कौटुंबिक खर्च वाढेल
मेहनत जास्त आणि लाभ कमी होण्याची शक्यता आहे. आजारपण आणि वाहनाचा खर्च वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुंटुंबाची साथ मिळेल. जोडीदारासोबत नाते अधिक दृढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कामात रस वाढेल.
मीन – आरोग्यात सुधारणा
एखाद्या दीर्घ आजारपणातून आराम मिळेल. आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र परिवारासोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम होईल. वादविवादांपासून दूर रहा.
वृषभ – लाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. संपत्ती खरेदीचा निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. तुमचे इच्छित ध्येय साध्य करू शकाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत भावनिक सबंध दृढ होतील.
मिथुन – दंतदुखीचा त्रास होईल
आज तुम्हाला दातांच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. मूडमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे. मुलांमुळे काहितरी समस्या निर्माण होऊ शकते. विवाहातील समस्या दूर होतील. योजना सफळ होतील मात्र आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
कर्क – जुने संबंध दृढ होतील
एखादे जुने नातेसंबंध दृढ होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. साहित्य अथवा संगीतातील रस वाढेल. वाहन बिघडण्याची शक्यता आहे. वाद-विवादांपासून दूर रहा.
सिंह – हलगर्जीपणा केल्यामुळे नुकसान
कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका. व्यवसायात जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेठी होतील.
कन्या – व्यवसायात यश मिळेल
आज तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळेल. काम वेळेत केल्याचा चांगला फायदा होऊ शकेल. ताण-तणाव आपोआप कमी होतील. घरात मंगलकार्यांची चर्चा सुरू होईल. प्रवासाचे बेत आखाल.
तूळ – व्यवसायात नुकसान
शिक्षण आणि नोकरीत त्रासाचा सामना करावा लागेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक तयारी ठेवण्याची गरज आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. वाद विवाद करणे टाळा. बिघडलेले प्रेमसंबध पुन्हा चांगले होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक – जोडीदाराचे आरोग्य बिघडेल
आज तुम्ही दिवसभर समस्यांचा सामना कराल. जोडीदाराची तब्येत अचानक बिघडेल. आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात ध्येय पूर्ण करण्याचा तणाव वाढेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. रचनात्मक कामात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण करू शकाल.
धनु – नातेसंबध सुधारतील
एखादे खाजगी नातेसंबध सुधारण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत रोमॅंटिक प्रवास घडेल. साहित्य अथवा संगीतातील रस वाढेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल.
मकर – विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. व्यावहारिक कौशल्याने व्यवसायात वाढ कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाने निर्णय घेतल्यामुळे कधी कधी योग्य यश मिळेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होण्याची शक्यता आहे.
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)