मेष – विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य करण्याची संधी
आज विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. राजकारणातील रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी सहकार्य करतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ – तणाव येण्याची शक्यता
आज चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यामुळे तणाव येण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. कोर्ट् कचेरीतून सुटका मिळेल. घरात राहून संगीतसाधनेत तल्लीन व्हाल.
मीन- जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल
आज जोडीदारासोबत वेळ मजेत जाणार आहे. बिघडलेली कामे दुरूस्त करण्यात यश मिळेल. जुन्या मित्रांसोबत फोनवर गप्पा माराल. प्रवासाला जाणे टाळा.
वृषभ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज तुमची व्यावसायिक कामे करण्याची घाई करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन कराल. वाहन चालवताना सावध राहा.
मिथुन – आरोग्यात सुधारणा
आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. पूर्वीसारखे उत्साही वाटू लागेल. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. एखाद्या मित्राच्या मदतीने व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवासाला जाणे टाळा.
कर्क – नवीन ओळखींमधून धोका मिळू शकतो
आज नवीन ओळखींपासून सावध राहा. धोका मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून भटकणार आहे. घरात बराच काळ अडकून पडल्यामुळे निराश व्हाल. नियमांचे पालन करा.
सिंह – मौल्यवान भेटवस्तू मिळणार आहेत
आज तुम्हाला धन अथवा मौल्यवान भेटवस्तू मिळण्याचा योग आहे. व्यावसायिक कामांसाठी प्रवास करणे टाळा. जीवनावश्यक गोष्टी खरेदी कराव्या लागतील. पदोन्नतीची संधी मिळणार आहे. आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घ्या.
कन्या – तणाव वाढण्याची शक्यता आहे
आज एखाद्या अज्ञात भितीमुळे तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. मन भितीने ग्रासण्याची शक्यता आहे. मुलांसोबत वेळ आनंदात जाऊ शकतो. घराबाहेर फिरायला जाणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
तूळ – घरात वेळ मजेत जाईल
आज कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून विरोध जाणवणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक असेल.
वृश्चिक – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भरटकण्याची शक्यता आहे. हट्टामुळे स्वतःचे नुकसान करून घेण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी वाढवताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु – नवीन कामे मिळण्याची शक्यता
आज व्यवसायात तुम्हाला नवीन कामे मिळू शकतात. जीवनावश्यक सामानाची खरेदी करावी लागेल. बिघडलेली कामे पुन्हा दुरूस्त कराल. जोडीदारासोबत कॅंडल लाईट डिनरचा आनंद घ्याल.
मकर – व्यवसायात समस्या जाणवतील
व्यवसायातील कामांंमध्ये अडचणी येतील. प्रॉपर्टी खरेदी करणं कठीण जाणार आहे. रचनात्त्मक कार्यात लाभ मिळेल. मंगल कार्याच्या योजना रद्द कराव्या लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
अधिक वाचा –
एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या