मेष – सुरुवात करा, यश मिळेल
कधी कधी माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवातच करत नाही. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. आत्मविश्वासाची, अभ्यासाची कमी, भाग्याची साथ नसनं आदी. मात्र चालायला सुरुवात केल्यावर मार्ग शोधणं सोपं जातं. मनुष्य पाण्यात पडला किंवा उतरला तरच पोहायला शिकू शकतो. तसंच आज तुम्ही सुरुवात करा. भाग्य तुमच्या सोबतीला येऊन यश नक्कीच मिळवून देईल. हे करीत असतांना प्रयत्नांनी परमे·ार प्राप्त होत असतो, हे कधीही विसरु नका. म्हणजे तुम्हाला काही प्राप्त करायला असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. तुम्हीवरकरणी कतीही कठोर वाटत असला तर आतुन कनवाळू स्वभावाचे आहात. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. आपला लाभ कसा होईल? प्रगती कशी साधता येईल. याकडे लक्ष द्या. हे करीत असतांना थेंबे थेंबेच तळं साचतं हे मात्र विसरु नका.
कुंभ – सत्याची कास धरा
जीवनात कशीही परिस्थिती आली तरी सत्याची कास सोडता कामा नये. कारण सत्य हे परेशान असू शकतं. मात्र ते पराजित कधीच होत नाही. त्यामुळे आज असत्याची बाजु घेऊन हित साधता येऊ शकत असलं तर एक दिवस सत्य समोर येतंच. म्हणून सत्याची कास सोडू नका. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, याचीही प्रचिती आज आपल्याला लाभू शकते. त्यामुळे होणारा त्रास, टीका, समस्या यांचा बावू करु नका. आपले प्रयत्न करीत राहा. जीवनात कुठलाच धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. ही सत्यतता लक्षात घेऊन आपण आज धोका पत्करायला हरकत नाही. सोबतच आपल्याला आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यावश्यक आहे. प्रयत्न करुनही इच्छित कार्याला विलंब होत असेल तर निराश होऊन प्रयत्न सोडू नका. आपल्याला यश मिळणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करीत राहा.
मीन- आरोग्य चांगले राहिल
कोणतंही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, जीनवातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी आपले आरोग्य सुदृढ राखणे अत्यावश्यक आहे. त्यातही तनासह मनाचेही आरोग्य जपले जाणे आवश्यक आहे हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज आपले आरोग्य चांगले राहिल. त्याचा लाभ घेऊन कार्य करीत राहा. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत मिळेल. सुसंवाद योग्य पद्धतीने होतील. प्रेमभावना जागृत होईल. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. त्यामुळे एखादा अविस्मरणीय क्षणही प्राप्त होऊ शकतो. त्याचा मनसोक्त आनंद घ्यायला चुकू नका. कर्मचा-यांसाठी बढतीचे योग आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही. एकंदरीत आजाचा दिवस आपल्यासाठी उत्तम दिवस आहे.
वृषभ- योग्यता उंची गाठेल
प्रत्येक व्यक्तीमध्ये अफाट शक्ती असते. तिला फक्त इच्छाशक्ती व आत्मवि·ाासाची जोड लाभली पाहिजे. म्हणजे मग आपली मात्र पात्रता वाढून योग्यतेची उंची वाढू शकते. त्यासाठी जोखिम उचलून आपण कार्य केले पाहिजे. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. जोखिम उचलून आज तुम्ही एखाद्या कार्याला सुरुवात केली तर भाग्य तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे. मात्र हे करीत असतांना परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. सोबच आज आपला अवास्तव खर्चही होऊ शकतो. म्हणून त्याकडे लक्ष द्या. अंथरुन पाहूनच पाय पसरायचे असतात. त्यामुळे खर्च करीत असतांना आपल्या उत्पन्नाकडे लक्ष द्यायला हवे. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असा आहे. त्याचा योग्य तो लाभ करवून घ्या.
मिथुन- गैरसमज, मतभेद नको
कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतूनही गैरसमज निर्माण होऊन मतभेद होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याचं रुपांतर मनभेदामध्ये होऊन भयंकर परिणाम भोगावे लागतात. त्यात जर गैरसमज जोडीदारासोबत असतील तर ते वेळीच दूर करणे अत्यावश्यक असते. हे आपल्याला शिकविणाारा आजचा दिवस आहे. कारण तुमचा जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतो. तो लागलीच दूर करुन वाढणार नाही याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आज आपण आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण अपचनाचा त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो. आपलं उत्पन्न व खर्च यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. अवास्तव खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नोकरी व व्यवसायामध्ये आज चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. त्याचा योग्य तो लाभ करवून घ्या.
कर्क- टिका व तक्रारींकडे दुर्लक्ष करा
निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. आपली कार्यकुशलता वाढविण्यासाठी ते गरजेचं असतं. मात्र कधी कधी निदंकाकडून वारंवार होणारी टिका किंवा तक्रारींमुळे आपलं लक्ष विचलित होत असतं. आपण त्यात अडकून पडत असतो. त्याचा मानसिक त्रासही होत असतो. मात्र यश मिळवायचे असेल तर याकडे दुर्लक्ष करावेच लागेल हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज टिका व तक्रार याकडे लक्ष देऊ नका किंवा स्वत:ही ते करण्यामध्ये वेळ घालवू नका. जे पदरात पडत आहे ते पवित्र मानुन त्याचा स्विकार करा. प्रयत्न करायलाआज अजिबात कमी पडू नका. कारण आजचा दिवस विशेष करुन व्यावसायिकांना यश मिळवून देणारा आहे. प्रयत्न करीत राहिल्याने आपल्या अपक्षेपेक्षाही जास्त काही आपल्याला आज मिळू शकतं. स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोणताही धोका न पत्करणे हा सर्वात मोठा धोका असतो हे आज लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रयत्न करीत राहा.
सिंह- इतरांवर टिका नको
एखाद्या चांगल्या गोष्टीला चांगली म्हणत नाही किंवा जो व्यक्ती प्रशंसा करु शकत नाही त्याला इतरांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नसतो. तसंही टिका टिप्पणी करणं शोभून दिसत नाही. म्हणून शक्यतोवर आज तरी इतरांवर टिका टिप्पणी नको. त्यात तुमचंच नुकसान होऊ शकतं. वरकरणी कनवाळू व आतुन कठोर अशा आतल्या काठीच्या लोकांपासून सावध राहा. ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. आपल्या राशीला चंद्र बारावा आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढू शकते. जो तुम्ही थांबवू शकत नाहीत.मात्र कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करु शकतात. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पर्यायी साधने तयार करण्याचा प्रयत्न करा. एकावरच विसंबून राहू नका.
कन्या- पर्याय तयार ठेवा
एखादं ध्येय साध्य करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो. योग्य ती तयारी करुन ते साध्य करण्यासाठी धडपडत असतो. मात्र अपेक्षित असं यश त्यात मिळालं नाही तर हतबल होतो. मात्र उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी एकाच पद्धतीने ते साध्य होईल किंवा आपण करीत असलेले प्रयत्न योग्यच असतील हे गरजेचं नाही. म्हणून पर्याय तयार ठेवायला हवेत. म्हणजे एका मार्गाने यश मिळत नसेल तर दुसरा पर्याय आपल्यालाकडे उपलब्ध असला पाहिजे हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. यश मिळवित असतांना सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहासही चुकीचा आहे. कधी कधी सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो, ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. कधी कधी आपण कोणता तरी मुर्खपणा केलेला असतो. त्याची फळे आपल्याला आज मिळू शकतात. त्यामुळे आलिया भोगासी असावे सादर ही मनस्थिती आपली असली पाहिजे.
तूळ- प्रगतीकडे लक्ष द्या
एखादं काम हाती घेतल्यानंतर, लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित केल्यानंतर ते विचलित होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. उगाचच दुस-या गोष्टींवर लक्ष दिल्याने आपण भरकटले जाऊ शकतो. त्यामुळे आपलं हित कशात आहे, आपली प्रगती कशी होईल? भरभराट कशी होईल? याकडे आपण आज लक्ष दिलं पाहिजे. आज आपले आरोग्य उत्तम राहिल. तनासह तनाचंही आरोग्य उत्तम राहिल्याने करीत असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होण्यास मदत मिळत असते. मात्र थेंबा थेंबानेच तळे साचते हे आपण आज लक्षात घेतले पाहिजे. एकदम काहीही पुर्णपणे प्राप्त होत नाही. त्यासाठी वाट बघावीच लागते. आज शब्दांवरही तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तडका फडकी कोणावर शेरेबाजी करणे आज हिताचे राहणार नाही. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न आज करु नका. जी वास्तविकता ही आहे तिला स्विकारुन प्रयत्न करीत राहा.
वृश्चिक- जंक फूड खाणे टाळावे
जेवण किंवा नाश्ता हा घरचाच चांगला असतो, हे प्रत्येकाला कळतं. मात्र तरीही काही वेळेस पर्याय नसतो म्हणून किंवा इच्छा होते म्हणून आपल्याला बाहेरचं खावं लागतं. काहीवेळेस त्याचा आपल्याला त्रासही होतो. आज शक्यतोवर बाहेरचं काही खाऊ नका. तशी गरजचं असेल तर किमान जंक फूड तर टाळाच. नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागूशकतात. सोशल मीडिया किंवा टिव्ही यांचा अतिरेक आज खूप मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांचा वापर विशेष करुन विद्यार्थ्यांनी कमी केला पाहिजे. त्यापासून दूर कसे राहता येईल याचा प्रयत्न करायला हवा. आज प्रकृती थोडी नरम गरमच राहणार आहे. त्यामुळे आरोग्य बिघडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. क़ाही मिळविण्याचा प्रयत्न करीत असतांना ते पूर्णपणे आपल्यालाच मिळेल हा अट्टहास आज नको. जे मिळतय ते पदरात पाडून घ्या. इतरांना त्यातलं किती मिळतंय याकडे लक्ष देऊ नका.
धनु- अनोळखी लोकांचा विरोध
कित्येक वेळेला विरोधासाठीही विरोध होत असतो. म्हणजे काहीही कारण नसतांनाही आपल्याला विरोधाचा सामना करावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे अनोळखी अनोळखी लोकांकडून होणारा विरोध हा जास्त डोकदुखीचा ठरत असतो. याचा अनुभव आज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे कुणाचा विरोध आपल्याला सहन करावा लागणार नाही आणि कुणी विरोध केलाच तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आज तुम्हाला जमलं पाहिजे. चंद्र आठवा असल्यामुळे आपल्याला आज आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. छोटे दुखणेही डोकेदुखी ठरु शकते. एखादं काम करीत असतांना फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी करायला नको. आपले प्रयत्न वाढवून कर्तृत्वावर भर द्यायला हवा. इच्छित कार्याला उशीर होऊ शकतो. म्हणून आत्मवि·ाास कमी होऊ न देता प्रयत्न सुरु ठेवा.
मकर- व्यायामासाठी वेळ काढा
कोणतंही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, जीवनाचा पुरेपुर आनंद उपभोगण्यासाठी तन व मन हे दोघंही सुदृढ राखणे अत्यावश्यक असते व त्यासाठी व्यायाम करावा लागतो हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. व्यायामासाठी वेळ काढावा लागेल याची प्रचिती आज आपल्याला मिळेल. कुणाच्याही व्यंगावर हसणे हे कधीही अयोग्यच असतं. त्यामुळे आपल्या हातून अशी होणार नाही याची काळजी घ्या. कोणतीही कृती करण्यापूर्वी आज तुम्हाला विचार करावा लागणार आहे. नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. जीवन जगत असतांना कोणत्याही एका गोष्टीमध्ये अडकून न पडता सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करावा लागतो. तरच आपण चांगले जीवन व्यतीत करु शकतो. ही सत्यता आपल्याला लक्षात घ्यावी लागेल.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद