ADVERTISEMENT
home / भविष्य
21 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, कुंभ राशीचा मालमत्तेचा वाद मिटण्याची शक्यता

21 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, कुंभ राशीचा मालमत्तेचा वाद मिटण्याची शक्यता

मेष : पदोन्नती थांबवली जाण्याची शक्यता  

आळशीपणामुळे कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा होऊ शकते. पदोन्नती थांबवली जाण्याची शक्यता आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यापासून सावध रहा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये रस वाढू शकतो. प्रेयसी/प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल. 

कुंभ : मालमत्तेचा वाद मिटण्याची शक्यता

मालमत्तेचा वाद मिटण्याची शक्यता आहे. कुटुंबियांमध्ये परस्पर समन्वय आणि प्रेम वाढेल. अचानक धनलाभ होण्याचा  योग आहे. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्तानं प्रवासाचे योग घडू शकतात.

ADVERTISEMENT

मीन : नवे प्रेम संबंध जुळण्याची शक्यता 

नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने प्रत्येक कठीण काम सोपे होईल. व्यवसायातील भागीदारी फायदेशीर ठरेल. कुटुंब किंवा मित्रांसह भ्रमंतीचा योग घडून येऊ शकतो. 

वृषभ : व्यावसायिक योजना यशस्वी होतील

कला आणि सिनेमा जगताशी संबंधित लोकांचा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक आदर आणि संपत्तीत वाढ होण्याची  शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

मिथुन : विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून भरकटू शकते  

विद्यार्थ्यांचं मन आज अभ्यासापासून भरकटू शकते. महत्त्वपूर्ण काम रखडण्याची शक्यता आहे. जोखीम असणाऱ्या कार्यांपासून दूर राहा. कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात.  

कर्क : शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल

अनावश्यक धावपळीमुळे तुम्ही आज त्रस्त असाल. शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवले. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक आदर वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

ADVERTISEMENT

सिंह : जोडीदारासोबत रोमँटिक क्षण अनुभवाल

जोडीदारासोबतचे रोमँटिक क्षण अनुभवाल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यानं केलेल्या मदतीमुळे रखडलेलं काम मार्गी लागेल. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर राहा. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता. भ्रमंतीचा योग आहे. 

कन्या : विद्यार्थ्यांना यश मिळेल

नशिबाचा उदय होईल, अशी संधी आज मिळू शकते. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. करिअरला एक नवी दिशा मिळेल. राजकारणातील महत्वाकांक्षा पूर्ण होतील. रखडलेली कार्य मार्गी लागतील. 

ADVERTISEMENT

तूळ : कोणलाही पैसे उधार देऊ नका 

कोणालाही आज उधारीवर रोखरक्कम देऊ नका, कारण ते पुन्हा मिळणार नाहीत. मेहनत अधिक होईल पण तुलनेत लाभ कमी प्रमाणात मिळतील. व्यवहारात फसवणूक होऊ शकते. धार्मिक कार्यात मन गुंतेल.

वृश्चिक : ताजेतवाने वाटेल    

घरगुती उपचारांमुळे आरोग्य ठीक राहील. आज संपूर्ण दिवस तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती बळकट राहील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यास यश मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील.  

ADVERTISEMENT

धनु : जोडीदाराबरोबर मतभेद वाढू शकतात

जोडीदारासोबत मतभेद वाढू शकतात. वादापासून दूर राहा. उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन राहील. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण करताना सतर्कता बाळगा. महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर : मानसिक तणावाची शक्यता

एखाद्या नकळत भीतीने मन भयभीत होईल. मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

ADVERTISEMENT

 

वाचा अधिक :

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

ADVERTISEMENT

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

18 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT