मेष : विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. नवीन कामाच्या योजना आखल्या जातील. गमावलेला विश्वास पुन्हा मिळवाल. नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ : आरोग्य बिघडू शकते
वृद्धांचे आरोग्य अचानक बिघडू शकते. व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. सध्या प्रवास करणे टाळा
मीन : विशेष भेट होऊ शकते
जुनी मैत्री नव्या संबंधांमध्ये बदलू शकते. जोडीदारामुळे नात्यात आलेली कटुता दूर होईल. नोकरीमध्ये मनासारखी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रा फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खिसा कापला जाऊ शकतो किंवा महत्त्वाचे कागदपत्र हरवण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : तणावातून सुटका मिळेल
आज तणावापासून सुटका मिळेल. उत्साहात एखाद्या नवीन कामाची सुरुवात कराल. व्यवसायात फायदा होईल. अपत्यासंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.
कर्क : गैरसमज होऊ शकतो
मित्रांसोबत वाद घालू नका. निरर्थक गुंतागुंत निर्माण होईल. तुमच्या बोलण्यानं कुटुंबात एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो. काळजी घ्या. अचानक प्रवास करावा लागेल. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होईल.
सिंह : लाभ आणि प्रगतीची शक्यता
आज चहुबाजूंनी प्रगती आणि नफा होण्याची शक्यता आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यापाराच्या क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील. नव्या प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ आहे. आरोग्य ठीक राहील आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कन्या : मानसिक तणावाची शक्यता
कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त असाल. मानसिक तणाव देखील होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली व्यक्तींसोबत झालेली भेट लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
तूळ : प्रेम संबंध दृढ होतील
आज बिघडलेले प्रेमसंबंधा चांगले होतील. एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होण्याची शक्यता आहे. गैरसमज होण्यापासून सतर्क राहा. सन्मानात वाढ होईल. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. नवीन वाहन खरेदी करू शकता.
वृश्चिक : ध्येयासाठी मेहनत करावी लागेल
लक्ष्य प्राप्तीसाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. नवीन संपर्कांपासू सावध राहा. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यांशी संबंध असणाऱ्यांना यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
धनु : कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. सुखसोयींच्या सुविधांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिक करार लाभदायक ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमामध्ये त्रिकुट होण्याची शक्यता आहे.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मकर : नोकरीतील अडचणींमुळे त्रस्त
आज संपूर्ण दिवस अस्ताव्यस्त राहील. नोकरीसंबंधी समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ असाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.