ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
23 एप्रिल 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला नवी नोकरी मिळण्याची शक्यता

23 एप्रिल 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला नवी नोकरी मिळण्याची शक्यता

मेष – खर्चात वाढ होईल

तुमचे स्वतःचे खर्च आज वाढण्याची शक्यता आहे. उगीच खर्च वाढतील त्यात देणेकऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील. स्वतःची उन्नती होण्यासाठी आपल्या व्यवहार आणि कार्यप्रणालीत बदल करा. वरीष्ठांकडून प्रशंसा होईल. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता.

कुंभ – अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याचा योग

आईच्या सहयोगामुळे कुटुंबात तुमचा पक्ष मजबूत होईल. अविवाहितांना आज विवाहाचे प्रस्ताव येण्याचा योग आहे. कुटुंबात सुखसमाधान राहील. विद्यार्थ्यांच्या समस्या सुटतील. सामाजिक सन्मानात वृद्धी होईल. व्यवसायात राजकारणाचा सहयोग मिळेल.

मीन – मनासारखी नोकरी मिळण्यात यशस्वी व्हाल

बऱ्याच संघर्षानंतर आज तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्यात यश मिळेल. वाढत्या आर्थिक त्रासापासून सुटका होईल. कुटुंबात आनंद टिकून राहील. मित्रांबरोबर प्रवासाचा योग. आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामं पूर्ण होतील.

वृषभ – आरोग्य नीट राहील

तुमचं आरोग्य नीट राहील. ताजंतवानं वाटेल. आज तुमच्या कार्यांना गती मिळे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात कोणत्या तरी चांगल्या कार्याविषयी चर्चा होऊ शकते. परदेशी जाण्याचा योग. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सर्व महत्त्वाची कामं मार्गी लागतील.

ADVERTISEMENT

मिथुन – बाहेरच्यांमुळे घरात क्लेश निर्माण होईल

बाहेरच्या व्यक्तींमुळे घरामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विचारांमध्ये भिन्नता असल्यास, मधुरवाणीने सोडवा. नव्या ओळखीपासून सावधानता बाळगा. आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिक गोष्टीत यशस्वी व्हाल.  रखडलेली कामं पूर्ण होतील. प्रवासाचा योग.

कर्क – नवं प्रोजेक्ट सुरु होण्याची शक्यता

व्यवसायात नवं प्रोजेक्ट सुरु होण्याची शक्यता आहे. नव्या संपर्कांचा फायदा होईल. उच्च अधिकाऱ्यांशी भेट तुमच्या यशामध्ये फायदेशीर ठरेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या. कौटुंबिक मित्रांबरोबर फिरायला जाण्याची योजना ठरू शकते. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.

सिंह – जवळच्या माणसाची तब्बेत खराब होऊ शकते

कुटुंबातील जवळच्या माणसाची तब्बेत खराब होऊ शकते. कुटुंबामध्ये निराशा आणि चिंतेचं वातावरण राहील. कार्यालयात घाईघाईत काम बिघडू शकतं. राजकारणात जबाबदारी वाढेल. जोडीदाराचं सहाय्य मिळेल. अचानक धनलाभ होईल.

कन्या – नव्या प्रेमाला सुरुवात

नव्या प्रेमाला सुरुवात होऊन यश मिळेल. वरीष्ठांच्या सहाय्याने वडिलार्जित संपत्तीची समस्या सोडवता येईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबाच्या मदतीने कठीणं कामं पूर्ण होतील. कार्यालयात नव्या जबाबदाऱ्या मिळतील. लांबचा प्रवास टाळा.

ADVERTISEMENT

तूळ – विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचण येण्याची शक्यता

विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचण येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रातही काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरीष्ठांशी भांडण होऊ शकतं. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराची मदत मिळेल आणि एकत्र राहाता येईल. जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील.

वृश्चिक – नवी नोकरी मिळण्याची शक्यता

प्रबळ भाग्योदयाची शक्यता आहे. नवी नोकरी मिळेल. व्यावसायिक प्रवास सुखकारक होतील. नव्या सहयोगींपासून फायदा होईल. वाहन खरेदीची योजना बनू शकते. कोर्टकचेरीच्या विवादापासून सुटका मिळेल. धार्मिक कार्यात आवड वाढेल.

धनु – कामामध्ये दुर्लक्ष करणं योग्य नाही

कामामध्ये दुर्लक्ष करणं योग्य नाही. वरीष्ठांची नाराजी ओढवून घेऊ शकता. नोकरी सुटू शकते. तुमच्या कामात विरोधक अडवू शकतात. दिलेलं कर्ज परत मिळण्याची शक्यता. खराब झालेलं काम पुन्हा चांगलं होईल. समाजात प्रतिष्ठा मिळेल.

मकर – जोडीदाराची तब्बेत खराब होऊ शकते

तुमची मनस्थिती आज चांगली राहणार नाही. जोडीदाराची तब्बेत खराब होऊ शकते. राजकारणामध्ये व्यस्त राहाल. कार्यालयत वातावरण चांगलं राहील. आई-बाबांची साथ मिळेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि पैशामध्ये वृद्धी होईल.

ADVERTISEMENT
20 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT