मेष – पाठदुखी सतावेल
आज तुम्हाला पाठीच्या दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
कुंभ – रखडलेले पैसे परत मिळतील
आज तुमचे खूप दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळणार आहे. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. एखाद्या व्यक्तीची मदत करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल.
मीन- व्यवसायातील समस्या वाढण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात समस्यांचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीचा ताण वाढणार आहे. आत्मविश्वासाने कमी होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रमंडळींसोबत फोनवरून संवाद साधाल.
वृषभ – व्यवसायात भावंडाचे सहकार्य मिळेल
आज व्यवसायात भावंडांचे सहकार्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवावे. सासरच्या लोकांकडून एखादी खुशखबर मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. वाहन चालवताना सावध राहा.
मिथुन – नवीन योजना तयार कराल
आज विद्यार्थी अभ्यासाठी नवीन योजना तयार करतील. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन चालवणे टाळा.
कर्क – आज कोणाला पैसे उधार देऊ नका
आज जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले तर ते परत मिळणार नाही. व्यावसायिक योजनांमध्ये जवळची पुंजी खर्चावी लागेल. मेहनत जास्त आणि लाभ कमी अशी अवस्था असेल. अध्यात्म आणि योगामधील आवड वाढणार आहे.
सिंह – जोडीदाराचा हेल्द रिपोर्ट चांगला असेल
जोडीदाराचा हेल्द रिपोर्ट चांगला असल्याने मन आनंदी राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाते असेल. व्यवसायात नवीन योजना तयार कराल. प्रिय व्यक्तीच्या भेटीत अडचणी येण्याची शक्यता आहे. आज वाहन चालवणे टाळा.
कन्या -भावंडासोबत भांडणे होण्याची शक्यता
आज तुमचे तुमच्या भावंडाशी वाद होणार आहेत. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय त्रासदायक असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिती ठीक राहील. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. लॉकडाऊनचे नियम पाळा. घरात मुलांसोबत वेळ घालवा.
वृश्चिक – लहानसहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका
आज तुमच्या लहानसहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत इनडोअर गेम खेळा. आईवडीलांची साथ मिळणार आहे.
धनु – कुटुंबाची साथ मिळणार आहे
आज तुम्हाला कौटुंबिक सहकार्यामुळे तुमचे ध्येय साध्य करता येणार आहे. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी साथ देणार आहेत. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
मकर – नवीन कामे सुरू करू नका
आज नवीन कामाला सुरूवात करू नका. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. जोडीदारासोबत नाते मजबूत राहील.
हे ही वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान
तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता ‘रंग’