मेष – पैशांचं नुकसान होण्याची शक्यता
आज तुमची एखादी महागडी वस्तू तुटण्याची अथवा हरवण्याची शक्यता आहे. कमी पैशांत जास्त कमवण्याच्या प्रयत्नात नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वडील अथवा धर्मगुरूंकडून मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – मुलांकडून आनंदवार्ता मिळेल
आज तुम्ही तुमच्या प्रियकराला जास्त लक्ष आणि वेळ द्याल. मुलांकडून आनंदवार्ता खुशखबर मिळेल. राजनैतिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. आज रिसर्चशी निगडीत उच्च शिक्षणाची संधी मिळेल.
मीन – लक्ष्य साध्य करण्यात यश मिळेल
आज व्यवसायात एखादे महत्त्वाचे काम मिळेल. लक्ष्य साध्य करण्यात तुम्हाला आज यश मिळणार आहे. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. कोर्ट-कचेरीत यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – घरगुती उपचारांमुळे लाभ होईल
आज तुम्हाला घरगुती उपचारांमुळे लाभ मिळणार आहे. अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक कामे करून घेण्यात तुम्हाला यश मिळेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होऊ शकते. आज तुम्हाला पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील.
मिथुन – ताणतणाव वाढणार आहे
आज तुमचा नातेसंबंधातील ताण-तणाव वाढणार आहे. कौटुंबिक गोष्टींमुळे दुःखी होऊ नका. आज कोणालाही उधारी देऊ नका. अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवलेलाच बरा. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. प्रवास करणे टाळा. धुर्त लोकांकडून सावध रहा.
कर्क – वातावरणातील बदलांमुळे मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता
वातावरणातील बदलांमुळे मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. एखादे काम पूर्ण करण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. युवकांना करिअरची नवीन आणि उत्तम संधी मिळेल.
सिंह – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौंटुबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. व्यावासायिक कामांसाठी प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात मन रमवा.
कन्या – विवाहात येण्याऱ्या अडचणी दूर होतील
आज तुमच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील लोकांशी निगडीत लोकांना मानसन्मान मिळेल. आज तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने बरंच काही मिळवू शकता. जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण घालवणार आहे. रचनात्मक कार्यातून प्रसिद्धी आणि धनसंप्तती मिळेल.
तूळ – एखादी नवीन योजना सूरू करणे सध्या टाळा
आज तुम्ही कोणतीही नवीन योजना सुरू करू नका. एखादी समस्या कामाच्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकते. आज पैशांची गुंतवणूक आणि उधारी देणे टाळा. घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी कराल.
वृश्चिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
आज रिअल इस्टेटच्या क्षेत्रातील लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. नोकरीसाठी नवीन मार्ग मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांच्यासोबत प्रवास कराल. जोडीदाराची साथ आणि सानिध्य मिळणार आहे.
धनु – अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील
आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मनाविरूद्ध जबाबदाऱ्या मिळतील. कामासाठी घरापासून दूर राहवं लागणारं आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीमुळे निराश व्हाल. देणी – घेणी सांभाळून करा.
मकर – घरातील वृद्ध लोकांची तब्येत बिघडेल
अचानक घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खराब असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
अधिक वाचा
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’