ADVERTISEMENT
home / भविष्य
23 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक

23 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक

मेष : अर्थसहाय्य मिळेल

आज दिवस व्यावसायिकांसाठी अतिशय लाभदायी आहे. आपण अर्थसहाय्य मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आपल्याला ते मिळू शकते. म्हणून प्रयत्न वाढवा. यश मिळविण्यासाठी आधी परिश्रम घ्यावेच लागतील. तेव्हाच भाग्याची साथ लाभेल. म्हणून स्वत:वर, आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. स्वत:तली लवचिकता वाढवा.

कुंभ : काळजी घ्या

दम्याच्या रुग्णांसाठी आज काळजी घेण्याचा दिवस आहे. आज आपल्यासाठी वातावरण खराब राहून त्रास वाढ शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा. वाहतुकीचे नियम पाळण्यावर भर द्या. घाई करुन कुठेही जावू नका. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.

ADVERTISEMENT

मीन : वृद्धीवर लक्ष द्या

व्यापा-यांना आज आपल्या वृद्धीवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपले हित कशात आहे, हे लक्षात घेऊन मिळणा-या संधीचा लाभ घ्या. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरु शकतो. कारण आज आपल्या प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. आपल्या निश्चियावर ठाम राहण्याचा प्रयत्न जरुर करावा, मात्र स्वत:तली लवचिकता थोडी वाढवा.

वृषभ : अभ्यासात लक्ष द्या

विद्यार्थ्यांचे मन आज भरकटू शकते. लक्ष विचलित होऊन त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते. म्हणून त्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, म्हणून काही प्राप्त करायचे असेल तर आपल्याला कठोर परिश्रम करावेच लागतील. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग दाखविणारा आजाचा दिवस असेल. रागावर नियंत्रण ठेवावे.

ADVERTISEMENT

कर्क : आरोग्य सांभाळा

आज आपल्याला स्वत:ची काळजी घेऊन आरोग्य सांभाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दगदगीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. आज आपले प्रवास करण्याचेही योग असून त्यात नवीन ओळखी होऊ शकतात. तडका-फडकी कोणावरही शेरेबाजी करु नका. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवून कुणी दुखावला जाणार नाही,याची काळजी घ्या.

मिथुन : आशीर्वाद मिळवा

गुरु व वडीलधा-या मंडळींच्या आशीर्वादाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या सानिध्यात जा. मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त करा. मनाला शांतीही लाभेल आणि नवीन मार्गही सापडतील. आज तुम्ही वास्तुवर आनंदाने खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. महत्वाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

सिंह : सामाजिक कार्यात सहभाग

आज तुमच्या मनाला अतीव आनंदाचा लाभ होऊ शकतो. कारण आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. सासुरवाडीकडूनही आज तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परिवारात आनंद वाढण्यासोबतच संबंधही सुदृढ होतील. कामातून थोडा वेळ स्वत:साठी काढून आराम करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.

कन्या : मनमुटाव होईल

आज तुमचा जोडीदाराशी मनमुटाव होईल. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे विषयाला जास्त ओढू नका. सामंजस्याची भुमिका घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला असे आज करु नका. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कुणाशीही बोलतांना मुद्देसुदच बोला. वाढणा-या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

तूळ : सहयोग मिळेल

आज तुम्हाला स्त्री पक्षाकडून सहयोग प्राप्त होण्याचे योग आहेत. त्यामुळे मनाला आनंद प्राप्त होऊन सकारात्मकता जागेल. मृग जळाच्या मागे न लागण्याचा सल्ला आपणास आज देण्यात येत आहे. जे पदरात पडलंय त्याला पवित्र मानुन त्याचा स्विकार करा. वास्तविकता लक्षात घ्या. टिका व तक्रार यांच्यात वेळ घालवू नका.

वृश्चिक : खेळीमेळीचे वातावरण

आज आपल्या घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. त्यामुळे मनाला आज दिवसभर तुम्ही आनंदीत राहाल. काम करीत असतांना टिका व तक्रार करीत असतांना वेळ घालवू नका. जे पदरात पडलंय ते पवित्र मानुन त्याचा स्विकार करा. कोणतेही काम किंवा निर्णय घेण्यापूर्वी व्यवसास्थित विचार करा. भावनेच्या आहारी जाऊ नका.

ADVERTISEMENT

धनु : वाद होईल

आज तुमच्या सासरच्या मंडळींशी वाद होऊ शकतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. आज बेशिस्त अजिबात राहू नका. नाही तर नुकसान होऊन एक ना धड भराभर चिंध्या याचा अनुभव येईल. थोडा तणाव जाणवेल. मनाला मरगळ आल्यासारखी वाटेल. ती घालविण्यासाठी सिनेमा बघायला जा.

मकर : धैर्याने निर्णय घ्या

तुम्ही आज जर कुटुंबामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असाल ते घेत असतांना धैर्य राखणे गरजेचे राहिल. भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. दुरचा प्रवास घडण्याचेही आज योग आहेत. आज आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. त्यामुळे प्रयत्न वाढवू बघा.

ADVERTISEMENT

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

लेखिकेचा संपर्क : श्री ज्योतिष संशोधन केंद

 

19 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT