मेष – करिअरची नवीन संधी मिळेल
आज तरूणांना करिअरची नवीन संधी मिळणार आहे. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक संबंध चांगले होतील. परदेशात प्रवासाचा योग आहे.
कुंभ – वृद्धांची तब्येत बिघडण्याची शक्यता
आज घरातील वृद्ध लोकांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराला व्यवसायात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सामाजिक मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.
मीन- कौटुंबिक सहकार्य मिळेल
आज तुमच्यासमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात एकमेकांवर विश्वासाची गरज आहे. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका पत्करावी लागेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृषभ – आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक संकट निर्माण होईल. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवसाय सावधपणे करा. योग्य वेळी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल.
मिथुन – आजारपणातून लवकर सुटका मिळेल
आज तुम्हाला जुन्या आजारपणातून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तुम्हाला आहाराबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.
कर्क – व्यावसायिक भागिदारीतून तणाव येण्याची शक्यता
आज एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. व्यावसायिक भागिदारीतील तणावदेखील वाढण्याची शक्यता आहे. आज कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा.
सिंह – मानसिक तणाव जाणवेल
आज तुम्हाला कौटुंबिक ताणतणाव जाणवणार आहे. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार आहे. वादविवादापासून दूर रहा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या – सासरच्या लोकांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल
सासरच्या लोकांकडून तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू मिळेल. व्यावसायिक कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. विद्यार्थांना क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. तरूणांना नोकरीची नवी संधी मिळेल.
तूळ – व्यवसायात भावंडांचे सहकार्य मिळेल
आज तुम्हाला भावाच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. अचल संपत्तीत वाढ होणार आहे. आरोग्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – व्यवसायात समस्या निर्माण होण्याची शक्यता
आज एखादे नवे काम सुरू करताना समस्या जाणवतील. वादविवादापासून दूर रहा. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या अंगावर पडतील. आर्थिक स्थिती चांगली असेल.
धनु – गुंतवणुकीत चांगला लाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाच्या योजना आखाल ज्यात तुम्हाला खात्रीशीर यश मिळणार आहे. आई-वडील आणि कुटुंबातील मंडळीचे सहकार्य मिळेल. प्रॉपर्टीशी निगडीत समस्या सुटतील.
मकर- अधिकाऱ्यांचा तणाव वाढण्याची शक्यता
आज कामाच्या गडबडीत तुमच्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचा तणाव वाढू शकतो. सामाजिक स्तरावर समस्या येण्याची शक्यता आहे. भावंडांशी नातेसंबंध चांगले असतील. कुटुंबात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात