मेष : धैर्य राखा
कुटुंबात आज जर तुम्ही कुठला निर्णय घेत असाल तर धैर्याने राखा. सर्वांना विश्वासात घ्या. निर्णय कुणावर थोपवू नका. लक्ष विचलित असल्याने आज तुमचा आत्मविश्वास कमी राहिल. त्यामुळे आज कुठलेच धाडस शक्यतोवर करु नका. एखाद्या गोष्टीवर आज विनाकारण संताप होईल. त्यांचा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा संतापाला आवर घाला.
कुंभ : वैवाहिक सौख्य मिळेल
वैवाहिक आयुष्यातील विविध रंगांचा आज तुम्ही अनुभव करणार असून त्यामुळे सौख्यात वाढ होणार आहे. अमर्याद सहनशिलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. आज कार्य व्यस्ततेचा दिवस असल्यामुळे अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यश नक्की मिळेल.
मीन : घराकडे लक्ष द्या
तुम्ही जरा घराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घर जर शितयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच थांबवा़ कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगतीचे संकेत आहेत. त्यामुळे तुमच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर सहन करावेच लागेल. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी एकांतांची आवश्यकता भासेल.
वृषभ : भावंडांशी मतभेद
एखाद्या छोट्या गोष्टीवरुन आज तुमचे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. मनाचा मोठेपणा दाखवा. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून आपली चूक शोधण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळ पर्यंत एखादा आकस्मिक आनंद प्राप्त होईल. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळणार आहे.
मिथुन : आर्थिक लाभ
कुटुंबवत्सल लोकांना आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जी संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बाब असेल. लेखक, कवी मंडळीसाठी आजचा दिवस लाभदायी असून त्यांच्या लेखन कार्याला यश मिळणार आहे. मनस्वास्थ बिघडविणारी घटना घडू शकते. त्यामुळे लक्ष विचलित होऊन आत्मविश्वासही कमी होईल.
कर्क : नवीन ओळखी
आज तुमचा नवीन ओळखी करुन घेण्याचा दिवस असून आत्मविश्वास व सकारात्मकतेने त्यांना समोरे जा. कुणाविषयी मनात वैरभावना असेल तर ती दूर करुन संबंध सुधरविण्यावर भर द्या. जळात राहून माशाशी वैर करु नये. कंटाळा किंवा तणाव आल्याने जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न कराल.
सिंह : सासरच्यांशी वाद
आजचा दिवस कौटुंबिक कलहाचा असून तुमचा सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी स्वत:ची अवस्था होणार नाही यासाठी शांत राहून विषय किंवा वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. शक्य तेवढे मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. कलाकारांना आज यश मिळेल.
कन्या : कौटुंबिक सौख्य
आज कौटुंबिक सौख्य वाढणार असून वैवाहिक आयुष्यात विविध रंग तुम्ही अनुभवणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. मात्र घराच्या बाहेर तुम्हाला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तोल मोल के बोल हे तुमच्या फायद्याचे राहिल. कामात अडचणी निर्मार होतील. प्रयत्न सुरुच ठेवा.
तूळ : मित्र आनंद देतील
आज तुम्ही मित्रांसोबत रमणार आहात. त्याच्याकडून तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. कृती करण्यापूर्वी विचार करा. नाही तर अब पछताये क्या होत, जब चिडीया चुग गई खेत अशी अवस्था होईल. अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना आज तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे लक्ष विचलित होईल. निराशा येईल.
वृश्चिक : सामंजस्य वाढेल
आज ओळखीच्या व्यक्तिबरोबर तुमचे सामंजस्य वाढणार आहे. त्याचा लाभ संबंध सुधरविण्यासाठी करुन घ्या. आज थोडीही बेशिस्त नको. एक ना धड भराभर चिंध्या, अशी अवस्था होणार नाही याची काळजी घ्या. मोडेन पण वाकणार नाही हे धोरुन सोडून स्वत:तली लवचिकता वाढवा. विनम्र राहण्याचा प्रयत्न करा.
धनु : मानसिक सुखशांती
आज तुम्ही मानसिक सुखशांतीच्या वातावरणाचा अनुभव करणार आहात. मात्र त्यामध्ये आपला आत्मविश्वास अति होऊन नुकसान होणार नाही, याप्रती तुम्हाला सजग राहावे लागणार आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, हे लक्षात असू द्या. यश मिळत नसेल तर आज प्रयत्नांची दिशा बदलावी लागेल.
मकर : सासुरवाडीकडून लाभ
आज पारिवारीक सौख्याचा दिवस असून आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण राहिल. अपूर्ण असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रयत्न वाढवा. आज यश मिळू शकतं. आज तुमच्या मानसन्मात वाढ होणार आहे.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र