मेष – बेरोजगार लोकांना काम मिळेल
आज नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत पदोन्नती होण्ययाची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आज प्रवासाचा योग आहे.
कुंभ – घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडेल
कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आजारपणामुळे निराश व्हाल. दिवसभर दगदग करावी लागेल. जोडीदाराची साथ आणि मदत मिळेल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. जमा आणि खर्चामध्ये समतोल राखा. धार्मिक कार्यात मन रमवा.
मीन- प्रसिद्ध लोकांशी भेट होईल
एखाद्या लोकप्रिय व्यक्तीशी भेट होईल. प्रेमसंबंधांना यश मिळेल. एकमेकांमधील वाद विसरून एकत्र आल्यास यश मिळेल. कोर्ट-कचेरीमधून सुटका मिळेल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. देण्या – घेण्याच्या समस्या सुटतील
वृषभ – अधिक पैसे कमावण्याचा लोभ नको
कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उधारी परत मिळेल. मानसिक तणाव वाढेल. लोकांच्या वाईट बोलण्याने दुःखी होऊ नका. अशा गोष्टींकड दुर्लक्ष केल्यास फायदा होईल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता.
मिथुन – आरोग्यात सुधारणा
बिघडलेली तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. आहार आणि व्यायामाबाबत सावध रहा. रखडलेली कामे सुधारतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा.
कर्क – जोडीदारासोबत तणाव वाढेल
जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. भागिदारीच्या व्यवसायापासून दूर रहा. उद्योगधंद्यात चढउतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो.
सिंह – जोडीदाराला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो
जोडीदाराला पोटाचे इनफेक्शन होण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. काम वेळेत करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे.व्यवसायात नवीन सहकारी मिळतील.
कन्या – पैशांसबंधी चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला अचानक धनसंपत्तीबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल. घर अथवा दुकानामध्ये इंटेरिअर डेकोरेशनचे काम कराल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळाल्याने आनंदी रहाल. धुर्त लोकांपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – कौंटुबिक संबध चांगले होतील
जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. ऊर्जा आणि उत्साह वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेकडून मानसन्मान मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात रस घ्याल.
वृश्चिक – आज नवीन काम सुरू करू नका
आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. व्यवसायातील एखादे काम पूर्ण करण्यास अडचणी येतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. कायदेशीर गोष्टींतून सुटका होईल.
धनु – वारसाहक्क मिळण्याचा योग आहे
घरातून वारसाहक्क मिळू शकतो. चल अथवा अचल संपत्ती खरेदी कराल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. व्यापारात एखादा व्यवहार फायदेशीर ठरेल. आरोग्याबाबत सावध रहा. प्रेमात त्रिकोणम निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि संयम राखा.
मकर- व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावध
आज व्यवसायाबाबत एखादा निर्णय घेताना पुन्हा विचार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची वागणूक त्रासदायक असेल. आत्मविश्वासाने काम करा. एखाद्या अज्ञान समस्येबाबत सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)