ADVERTISEMENT
home / भविष्य
24 मार्च 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना मिळणार आज आनंदवार्ता

24 मार्च 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना मिळणार आज आनंदवार्ता

मेष : कागदपत्रे सांभाळा

आज आपल्याला महत्त्वांची कागदपत्रांवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ते व्यवस्थित आहेत, की नाही याची खात्री करुन सांभाळून ठेवा. सौ बका एक लिखा हे लक्षात घेऊन कुणाच्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वपूर्ण व्यवहार करतांना सांभाळून करा. कुटुंबातील कोणातही निर्णय घेतांना धैर्य राखा.

कुंभ : आशीर्वाद मिळवा

गुरु व जेष्ठांचे आशीर्वाद मिळविण्याचा सल्ला आज आपणास देण्यात येत आहे. त्यांच्या सानिध्यात जाऊन मार्गदर्शन प्राप्त करा. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. आपल्या आज दिवसभर जोडीदाराचा प्रभाव राहणार आहे. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. कामातून थोडा वेळ काढून आराम करणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

मीन : लाभावर लक्ष द्या

कधी कधी स्वार्थी होऊ आपल्या लाभावर लक्ष देणं गरजेचं असतं. विशेषत: व्यावसायिकांनी आज स्वार्थी होण्याची गरज आहे. मिळणा-या संधीचा लाभ घ्या. आपल्या राशीला चंद्र आठवा असल्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. आज फुकटच्या गप्पा टप्पा नकोत. नाही तर बोलाचा भात आणि बोलाचीच कढी अशी अवस्था होऊ शकते.

वृषभ : सोशल मीडिया घातक

सोशल मीडियाचा अतिरेक आज सर्वांसाठीच घातक ठरत आहे. विद्यार्थ्यांनी त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सोशल मीडियामुळे अभ्यासावर दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. वडीलांकडून आज तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.

ADVERTISEMENT

मिथुन : जोड व्यवसायाचा विचार

प्रगतीच्या दृष्टीकोनातून आज जोड व्यवसायाचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे बरोबर नाही, म्हणून कोणताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. आज तुमचे वडीलांशी मदभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करावा. आज वेळ मिळत असल्याने मनसोक्त जगून घ्या.

कर्क : विचारपूर्वक निर्णय घ्या

आज गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर निर्णय विचारपूर्वक व तज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्या. ओळकीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य आज वाढण्यास मदत होईल. त्यामुळे संबंध अधिक सुदृढ बनविण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नांवरील निर्णय आज घेऊ नका. ते उद्यावर ढकल्याचा प्रयत्न करा.

ADVERTISEMENT

सिंह : सुर्वाता कानी येतील

नोकरदार मंडळींसह व्यावसायिकांसाठीही आजचा दिवस लाभाचा ठरु शकतो. कारण आज आपल्या कामासंबंधी सुर्वाता कानी येऊ शकतात. मिळणा-या संधीचा परिपूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून तुम्हाला आज आनंद प्राप्त होऊ शकतो. आपल्या संस्कारांशी नाळ जोडून ठेवा. आपण चुकीच्या मार्गावर तर प्रवास करीत नाही आहोत ना याची खात्री करुन घ्या.

कन्या : त्रास वाढेल

आज विशेषत: रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचा दिवस आहे. त्यांचा त्रास वाढू शकतो. दुरवचे प्रवास आज घडू शकतील. प्रवासाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आपले जर कोर्ट कचेरीचे प्रकरणे सुरु असतील तर आज त्यात यश मिळू शकतं. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवून बघा.

ADVERTISEMENT

तूळ : व्यापार व्यवसाय सुखद

व्यापारी व व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आज सुखद वातावरण राहिल. संधी मिळून लाभ होऊ शकतो. आज आपल्याला मित्रांपासूनही लाभ होऊ शकतो. त्यांच्यासोबत तुम्ही आज एखाद्या गोष्टीचे नियोजन करु शकता. कुणाच्याही व्यंगावर हसणे हे कधीही वाईटच आहे. आज तर ते अजिबातच नको.

वृश्चिक : त्रास वाढेल

दम्याचा आजार असलेल्यांना आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण आपल्या दृष्टीने आज वातावरण खराब राहून त्रास वाढू शकतो. एखाद्या संकटांतून आज तुम्ही सुखरुपपणे बाहेर पडू शकतात. त्यामुळे ईश्वाराचे आपल्यावर आशीर्वाद असल्याची भावना मनात दाटून येईल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा.

ADVERTISEMENT

धनु : दुखापत होण्याची शक्यता

आज आपल्या हात किंवा पायाला ईजा होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वत:ची काळजी घ्या. आज दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहू शकता. मनाला प्रसन्नता वाटेल. परमे·ाराची आपल्यावर कृपादृष्टी असल्याची भावना मनात घर करेल. हा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी आज नकारात्मक विचारांपासून चार हात लांबच राहा.

मकर : गुंतवणूक करा

आपल्या मनात जर गुंतवणूक करण्याचा विचार सुरु असेल तर आज करायला हरकत नाही. एखाद्याबद्दल मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. लहान फायद्यासाठी आपले मोठे नुकसान व्हायला नको. म्हणून ऐकावे जनाचेव करावे मनाचे हा मार्ग तुम्हाला स्विकारावा लागेल.

ADVERTISEMENT

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

19 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT