मेष- कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल
कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे. बोलताना सावध रहा. महत्वाची कामे करण्याचा आळस करू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.
कुंभ- व्यवसायात वाढ होईल
व्यवसायात वाढ होईल. उत्पन्नांच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. नोकरीत बदल होऊ शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. एखाद्याकडून आर्थिक मदत घेण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे.
मीन- जोडीदारासोबत असलेला वाद मिटेल
जोडीदारासोबत सुरू असलेले भांडण संपण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मुलांकडून एखादी आनंद वार्ता मिळू शकते. राजकारणात तुमचे पद वाढेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे विनाखर्च पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
वृषभ- दिलेले पैसे परत मिळतील
कला आणि सिनेक्षेत्रातील लोकांना फायदा होईल. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात उन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरीत उत्पन्न वाढेल. मुलांबाबत आनंदवार्ता मिळतील. प्रवासाचा योग आहे. सामाजिक सन्मान वाढेल.
मिथुन- व्यावसायिक व्यवहार रद्द होतील
कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. व्यावसायिक व्यवहार रद्द होतील. विरोधकांपासून सावध रहा. इतरांना आकर्षित कराल. कुटुंबाकडून भावनिक सहकार्य मिळेल.
कर्क – मानसिक ताण जाणवेल
आज तुम्हाला मानसिक अशांतता जाणवेल. बोलण्याने गैरसमज दूर होतील. सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात धुर्त लोकांपासून सावध रहा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढेल.
सिंह – कौटुंबिक वाद मिटेल
थोरामोठ्यांंच्या मदतीने कौटुंबिक वाद मिटवण्यात यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. व्यवसायात मित्रांकडून सहकार्य मिळेल. परदेशी कंपन्यांसोबत संबंध वाढतील. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण निर्माण होईल.
कन्या- नवीन काम मिळण्यात यश
काम शोधण्यात यश मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. घरात यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदारासोबत नातं दृढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक सन्मान आणि धनलाभ होईल.
तूळ – कौटुंबिक खर्च वाढेल
एखाद्या खास व्यक्तीमुळे कुटुंबातील खर्च वाढतील. कमी पैशात अधिक लाभ देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेऊ नका. व्यवसायात नवीन काम सुरू करताना सावध रहा. कामातील मंद गतीमुळे आर्थिक संकट येऊ शकते.
वृश्चिक- एखाद्या जुन्या आजारपणातून सुटका
जोडीदाराची जुनाट आजारपणातून सुटका होईल. नियमित दिनचर्या आणि सुर्यस्नान करणे टाळू नका. सामाजिक सन्मान मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी होतील. उत्पन्नाचे साधन वाढेल. जुने मित्र भेटण्यात यश मिळेल.
धनु – कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे
प्रॉपर्टीच्या बाबतीत असलेले वाद वाढतील. तुमच्या कडवट बोलण्यामुळे लोक नाराज होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. सहज वाटणारी कामे करणं कठीण जाईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.
मकर – गुडघेदुखी जाणवेल
आज तुम्हाला पाय अथवा गुडघेदुखी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक चर्चांना यश येईल. वादविवाद करणे टाळा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण कराल.