मेष : शारीरिक अशक्तपणा आणि थकवा राहील
कामाच्या निमित्तानं धावपळ होईल. शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवले. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर रहा रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ : आरोग्य चांगले राहील
आरोग्य चांगले राहील. काहीतरी नवीन करण्याची आवड कायम राहील. कामाच्या ठिकाणी झालेला बदल आनंददायी असेल. आत्मविश्वास वाढेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढू शकतात.
मीन : अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका
अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. फसवणूक होऊ शकते. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलण्याची गरज भासू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. रखडलेली कामे पूर्ण होतील. कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळेल.
वृषभ : संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे. सामाजिक संस्थेद्वारे सन्मान होण्याची शक्यता. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यात आपणास यश मिळेल.
मिथुन : कार्यालयात सर्वांचे सहकार्य मिळेल
परस्परांतील मतभेद विसरून कार्य करण्यास प्रारंभ करा, यश मिळेल. बिघडलेली आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक यात्रेचा योग आहे.
कर्क : चांगल्या संधीचा शोध
तरुण मंडळी करिअरमध्ये चांगल्या संधीच्या शोधात असतील. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अपत्यांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते.
सिंह : कौंटुबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आपण चांगला नफा कमवू शकता. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना सतर्क राहा.
कन्या : कामाच्या ठिकाणी ताणतणावाची शक्यता
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून ताणतणाव वाढू शकतात. संभाषण नरमाई करा. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा. महत्त्वाच्या कामात आळस दाखवू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात रस वाढेल.
तूळ : प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता
तणावामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता टिकवून ठेवा. आपल्या जोडीदारासह जास्तीत जास्त वेळ घालवा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : संवाद आणि प्रेम वाढेल
कुटुंबीयांसोबत संवाद आणि प्रेम वाढेल. मुलांविषयीच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. सामाजिक कार्यात रस वाढेल. मान्यवरांसोबत झालेली भेट फायद्याची ठरेल.
धनु : परिस्थिती अनुकूल राहतील
व्यवसाय आणि नोकरीच्या परिस्थिती अनुकूल असतील. कार्यालयाच्या ठिकाणी कामाप्रति कल वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मकर : अधिक कमावण्याचा विचार टाळा
कमी वेळात अधिक पैसे कमवण्याच्या भानगडीत पडू नका. यामुळे खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण केली जातील. सामाजिक आदर वाढेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी