मेष – चल-अचल संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही एखादी चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची संधी मिळेल. महत्त्वाची रखडलेली कामे पूर्ण कराल. खऱ्या प्रेमाचा शोध पूर्ण होईल.
कुंभ – कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता
आज प्रॉपर्टीवरून तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. एखाद्याला दिलेले वचन आज तुम्ही पूर्ण करणार आहात. रागावर नियंत्रण ठेवा. रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. राजकारणातील रस वाढण्याची शक्यता आहे.
मीन – आरोग्य खराब होण्याची शक्यता
आज खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींंमुळे तुमचे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. नवीन मित्रमंडळी भेटतील. छोट्या – मोठ्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. वाहन चालवताना सावध राहा.
वृषभ – विवाहाची योजना आखाल
आज अविवाहितांचा विवाह ठरण्यासाठी शक्यता आहे. सामूहिक कार्यात सर्वाच्या सहमतीने निर्णय घ्या. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल.
मिथुन – अनावश्यक कामात वेळ वाया घालवाल
आज विद्यार्थ्यांचा वेळ अनावश्यक कामांमध्ये वाया जाणार आहे. कामाच्या ठिकाणी बिनगरजेच्या कामांचा ताण वाढणार आहे. वायफळ बडबड करण्यात वेळ वाया घालवू नका. देण्या-घेण्याच्या समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल.
कर्क – धनसंपत्ती अथवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे
आज सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू अथवा धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. इतर कामे नियमित करत राहा. राजकारणाचा व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रेमवीरांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सिंह – अधिकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे
आज कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकारी व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक प्रवासात कष्ट जाणवतील. एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
कन्या – व्हायरल तापाच्या साथीमुळे आज आजारी पडाल
आज तुम्ही व्हायरल तापाच्या साथीमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. चिडचिड आणि थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त कामात मन रमेल. उधारी घेणे टाळा.
तूळ – कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल
आज तुम्ही घरातील नाराज झालेल्या लोकांना खुश करणार आहात. घरातील वातावरण आनंदाचे असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. भावंडाच्या मदतीमुळे व्यावसायिक समस्या दूर होतील. विरोधकांना मात देण्यात यशस्वी व्हाल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल
आज विद्यार्थ्यांना मेहनतीचे अचूक फळ मिळेल. कामाच्या ठिकामी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. लाभाच्या नवीन ऑफर समोर येतील. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल.
धनु – आर्थिक संकट येण्याची शक्यता
आज कमी वेळेत जास्त कमावण्याच्या प्रयत्नात तुमच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. दिखावा करण्यात पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. जोडीदाराची साथ मिळेल.
मकर – उत्साही वाटेल
आज मनासारखा प्रवास झाल्यामुळे दिवसभर उत्साही वाटेल. व्यवसायातील योजना सफळ होतील. कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला आज आकर्षित करण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात