ADVERTISEMENT
home / भविष्य
25 एप्रिल 2020 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

25 एप्रिल 2020 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

मेष – अचानक धनलाभ

आज तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. राजकारणातील रस वाढणार आहे. बिघडलेली कामे पूर्ण करा. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. 

कुंभ – कॅंडल लाईट डिनरची योजना आखाल

आज जोडीदारासोबत तुम्ही कॅंडल लाईट डिनरची योजना आखाल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळणार आहे. रखडलेले पैसे परत मिळतील. मुलांसोबत नवीन कला शिकण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

 

मीन- पर्यटन व्यवसायात अडचणी येतील

आज पर्यटन व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. जुने मित्रांशी व्हिडिओ कॉल अथवा फोनवरून संपर्क साधाल. मुलांसोबत दिवसभर वेळ कसा गेला कळणार नाही. 

वृषभ – कामाच्या ठिकाणी समस्या येतील

ADVERTISEMENT

आज विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवी तंत्रज्ञान आत्मसात करणे कठीण जाईल. उत्पन्न आणि खर्च यात समतोल साधा. योगासनांमध्ये आवड निर्माण होईल.

मिथुन – विनाकारण चिंता सतावणार आहे

आज तुम्हाला विनाकारण एखादी चिंता सतावणार आहे. विरोधकांचा त्रास कमी होईल. घरात राहून तुमचे अर्धवट राहीलेले छंद जोपासा. खर्चावर नियंत्रण ठेवा. बाहेरच्या लोकांना भेटणे त्रासदायक ठरेल. 

कर्क – बिघडलेले नातेसंबध सुधारणार आहेत

ADVERTISEMENT

नाती सुधारण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत संगीत साधनेत वेळ घालवा. वाहन चालवताना सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. उच्च शिक्षणात सध्या अडचण  येण्याची शक्यता आहे. 

सिंह – व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

आज तुमच्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आधी पूर्ण करा. कुटुंबांसोबत वातावरण आनंदाचे असेल. रचनात्मक कार्यात मन रमणार आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा.

कन्या –  मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता

ADVERTISEMENT

आज नातेवाईकांमध्ये कोणताही व्यवहार करू नका. नातेसंबध खराब होण्याची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. वादविवाद करणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

तूळ – मानसिक तणाव कमी होईल

आज तुमचा मानसिक ताणतणाव कमी होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. बिघडलेली कामे पूर्ण होणार आहेत. परदेशी लोकांपासून दूर राहा. घरातील सजावटीत वेळ घालवा. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

वृश्चिक – कुटुंबाकडून विरोध होणार आहे

ADVERTISEMENT

आज तुमच्या घरातून तुमच्या कामाला विरोध होणार आहे. व्यवसायात चढ – उतार येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कुटुंबाबातील लोकांसोबत रचनात्मक कार्य करण्याची आवड निर्माण होऊ शकते. 

धनु – उत्पन्नाचे नवे साधन मिळेल

आज तुम्हाला उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे. फोन अथवा व्हिडिओ कॉलवरून अधिकाऱ्यांसोबत एखादी नवी योजना आखाल. विवाहातील अडचणी दूर होतील. मुलांसोबत घरात वेळ घालवाल. 

मकर – अज्ञात भिती जाणवणार आहे

ADVERTISEMENT

आज एखादी अज्ञात भिती तुम्हाला जाणवू शकते. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. 

 

अधिक वाचा –

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

ADVERTISEMENT

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

 

 

ADVERTISEMENT
22 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT