ADVERTISEMENT
home / भविष्य
25 मार्च 2019 चं राशीफळ,  वृषभ राशीसाठी आज भाग्योदयाचा काळ

25 मार्च 2019 चं राशीफळ, वृषभ राशीसाठी आज भाग्योदयाचा काळ

मेष : भागिदारी उत्तम

भागीदारीमध्ये जे व्यवसाय करीत असतील त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज आपल्याला व्यवसाय वृद्धीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. आज आपल्या घरात आनंदी आनंद असेल. कारर आज जोडीदराचे आपल्याला सहकार्य लाभेल. मात्र त्याच बरोबर खर्चातही वाढ होणार आहे. जो तुम्ही आनंदाने करणार आहात. दिवस लाभाचा असल्याने संयम व सामंजस्याने वागा.

कुंभ : खेळात सहभाग

आज मुले मैदानी खेळामध्ये सहभाग घेतील. त्यात त्यांना यश व आनंद या दोघांची प्राप्ती होणार आहे. जोडीदाराशी आज थोडं गोडीगुलाबीनेच वागा. नाही तर भांड्याला भांड लागून आवाज होणारच आहे. चिंता ही चितेला जाळत असते. म्हणून चिंता सोडून चिंतन करण्यावर भर द्या. त्यातुन नवीन मार्ग सापडू शकतात.

ADVERTISEMENT

मीन : दुखणे वाढेल

आपले दातांचे दुखणे सुरु असेल तर आज वाढू शकते. म्हणून काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधी सुरु ठेवा. तुम्ही आज धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. मनाला थोडी अस्थिरता जाणवेल. असं म्हणतात मन चिंती जे वैरी न चिंती म्हणून अस्थिर राहून विचार भरकटवू नका. त्यात तुमचेच नुकसान होऊ शकते.

वृषभ : भाग्याची साथ

आज आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. कारण आज आपल्याला भाग्याची साथ लाभणार आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली महत्त्वपूर्ण कामे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना आज तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे लक्ष विचलित होणार नाही, याची दक्षता घ्या. आजचा दिवस सर्व दृष्टीने उत्तम आहे.

ADVERTISEMENT

मिथुन : गुंतवणूक करतांना सावधान

आज व्यावसायिकांनी थोडे सावध राहायला हवे. प्रगतीच्या दृष्टीकोनातून जर तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर आपली फसगत होणार नाही,याची काळजी घ्या. भांवडांशी वादविवाद होण्याची आज शक्यता असल्याने ते टाळण्याचा प्रयत्न करावा. टाळी एका हाताने वाजत नाही, हे लक्षात घ्या. टीका व तक्रार यामध्ये वेळ घालवू नका.

कर्क : त्रास वाढेल

सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण आज आपल्या त्रास वाढ होऊ शकते. आपल्या राशीला चौथा असलेला चंद्र मनाला अस्वस्थता देऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून चिंतनासह ध्यान धारणा करण्यावर भर द्या. व्यवसांनापासून लांब राहणेच आपल्या हिताचे राहिल.

ADVERTISEMENT

सिंह : मुलांकडून अपेक्षा नकोत

मुलांनी नेहमी आपल्याकडे मर्जीप्रमाणे वागावं ही अपेक्षा व्यर्थ आहे. आज तर ती अजिबात नको. आज मुलं तुमच्या मर्जीप्रमाणे वागणार नसल्याने त्याच्यांकडे दुर्लक्ष करणेच तुमच्यासाठी हिताचे राहिल. आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने आज तुमच्या मनाला मनस्वी आनंद प्राप्त होईल. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन पाहा.

कन्या : राजमार्ग सापडेल

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी व महत्त्वाचा आहे. कारण आज तुम्हाला यशाचा राजमार्ग सापडू शकतो. त्यात भाग्याचीही साथ लाभू शकते. म्हणून प्रयत्न वाढवा. वडील बंधुंकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. मात्र आज प्रकृतीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल.

ADVERTISEMENT

तूळ : प्रसन्नता वाटेल

आजचा दिवस कसाही असला तरी मुलांमुळे आजची तुमची सायंकाळ मात्र प्रसन्नतापूर्ण होणार आहे. एखाद्या मोठ्या संकटातून आज सुखरुपपणे बाहेर पडाल. तेव दारी त्याला कोण मारी, ही भावना मनात दाटून येईल. तणावातून बाहेर पडण्यासाठी, आनंदासाठी आज चैन व मनोरंजनावर तुम्ही पैसा खर्च करणार आहात.

वृश्चिक : काळजी घ्या

आज विशेषत: जेष्ठ नागरीकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. छोटे आजार आज बळावू शकतात. आपले आर्थिक नियोजन आज उत्तम ठरु शकते. ते सदैव तसेच ठेवण्यासाठी प्रयत्न करा. इतर गोष्टींमध्ये वेळ न दवडता आपल्या दैनंदिन कामात अधिक लक्ष द्या. हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

ADVERTISEMENT

धनु : अन्नबाधेचा त्रास

आज आपल्याला आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण आज आपल्याला अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. प्रवासाचेही योग असून त्यामध्ये अधिक दक्षता बाळगावी. नाही तर नुकसान होऊ शकतं. सहका-याकडून मदतीचा हात मिळेल.

मकर : अनुकूल वातावरण

आज बांधकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण राहिल. त्यामुळे त्यांनी आपली महत्त्वपूर्ण कामे आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आज दिवसभर तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे प्रगतीसाठी कोणतेही धाडस करायला मागेपुढे पाहु नका. मात्र मृग जळाच्या मागे लागणे आपल्या हिताचे राहणार नाही.

ADVERTISEMENT

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

19 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT