ADVERTISEMENT
home / भविष्य
25 मे राशीफळ, सिंह राशीने घ्यावी आरोग्याची काळजी

25 मे राशीफळ, सिंह राशीने घ्यावी आरोग्याची काळजी

मेष : विवाहाचे योग आहेत

अविवाहितांसाठी अगदी योग्य काळ आहे. विवाहाचे योग आहेत. तुमच्या मनातील गोष्ट मनात ठेवू नका. प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार संभवतो. अचानक कुठेतरी जाण्याचा बेत आखाल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ :जोडीदाराची काळजी घ्या

जोडीदाराने आज सांभाळून चालायला हवे. दुखापत होण्याची शक्यता आहे. संततीकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत बदल करण्याची इच्छा होईल. वाढत्या खर्चामुळे नवे काम सुरु करण्याची शक्यता आहे. अडकलेली काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 मीन : कौटुंबिक संपत्ती मिळेल

कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.अडकलेली कामे पूर्ण होतील .समाजात सन्मान आणि संपत्तीमध्ये वृद्धि होईल. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या स्रोत वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे खासगी संबंध चांगले राहतील. वाहन चालवताना सावधान

वृषभ: बेजाजबदारपणामुळे संधी गमवाल

आज तुमच्या बेजबाबदार वागणुकीमुळे चांगल्या संधी गमवाल. व्यावसायिक दौऱ्यादरम्यान सावध राहा. कोणत्याही अडचणीत सापडू नका. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादापासून दूर राहा. घरातील ज्येष्ठांच्या मदतीमुळे काही अडचणी दूर होतील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

ADVERTISEMENT

मिथुन : बिघडलेली कामे पूर्ण होतील

आज तुम्हाला एखादे उपहार मिळेल किंवा समाजातील तुमचे स्थान उंचावेल. व्यवसायासाठी आखलेल्या योजना पूर्ण होतील. नवे पार्टनर मिळतील. नोकरीमध्ये पदोन्नति होईल. कुटुंबासोबत कुठे तरी यात्रेला जाण्याची शक्यता आहे. बिघडलेले कामे पूर्ण होतील. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

कर्क : आज मन अस्वस्थ राहील

आज कामाच्या ठिकाणी झालेल्या छोट्या चुकीमुळे वरिष्ठांचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. अचानक पार्टनरकडून येणारा पैसा अडकण्याची शक्यता आहे. आज मन अस्वस्थ राहील. जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभेल. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल.

सिंह: अचानक तब्येत बिघडेल

आज तुमचे आरोग्य अचानक बिघडू शकते. तुमच्या खाण्यापिण्याचा सवयीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात काही गोष्टीवरुन भांडण होऊ शकते. व्यवसायातील भागीदारीतून तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना सावधान

 कन्या : विरोधकांना मात देण्यामध्ये यशस्वी व्हाल

कुटुंबातील कलह मिटतील. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विरोधकांना मात देण्यामध्ये यशस्वी व्हाल.अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय घेऊ नका.

ADVERTISEMENT

तूळ: मेहनतीचे फळ मिळेल

विद्यार्थ्यांना त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आखलेल्या नव्या योजना आज तुमच्यामध्ये उत्साह आणतील. राजकारणात पुढे जाण्याची आज संधी मिळेल. सामाजिक सन्मान आणि संपत्तीत वाढ होईल.

वृश्चिक:  कोणाकडूनही कर्ज घेऊ नका

पैशांच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका. पैशासंदर्भात अडचणी येण्याची शक्यता आहे. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. ताणतणावामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यकुशलता तशीच ठेवा. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

धनु:  आरोग्यात होईल सुधारणा

दिनचर्येत बदल करा, त्यामुळे बिघडलेले आरोग्य सुधरेल. आत्मविश्वास वाढेल.अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या संतुलित वागणुकीमुळे समाजात तुमची पत वाढेल. व्यावसायात भागीदारीतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामामुळे खूश होतील.

मकर:  शेजाऱ्यांमुळे येतील अडचणी

आज शेजाऱ्यांमुळे तुम्हाला काही अडचणी येतील. कोणत्या विशेष कामात सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. विचार केलेली काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. रचनात्मक कामात तुमचे मन रमेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा

आळशी असतात या राशीचे लोक, तुम्ही नाही ना या पैकी एक

जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग

राशीवरुन ठरवा तुमचेही मित्र आहेत का अशा स्वभावाचे

 

ADVERTISEMENT

 

 

24 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT