मेष – नोकरीत प्रमोशनची शक्यता
आज तुमचे दोन्ही कान दुखण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. व्यापारात वृद्धी होईल किंवा नोकरीत प्रमोशनची संधी चालून येईल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. कोर्ट कटेरीमध्ये तुम्हाला यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कुंभ – व्यवसाय विस्ताराची शक्यता
प्रियकराकडून गिफ्ट मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आईकडून संपत्ती मिळू शकते. कोर्ट कचेरीतील खटल्यापासून सुटका होईल. मुलांकडून सुख मिळेल. व्यवसाय विस्तार आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भावुक होऊन घेतलेले निर्णय बदलावे लागतील. परदेशी यात्रेसाठी तुमही जाऊ शकता.
मीन – घाईत काम करु नका.
आज नोकरीत तुम्हाला अडचणी येऊ शकतील. पटकन काम करायला जाल आणि तुमच्या हातून मोठी चूक होईल. कोर्टातील खटल्याबाबत अडचणी येतील. आत्मविश्वास कमी होईल. जोडीदारासोबत तणावपूर्ण वातावरण राहील. धार्मिक कार्यांची आवड वाढेल. रचनात्मक कामांतून प्रसिद्धी मिळेल.
वृषभ -कामं वेळेवर होतील
तुमच्यावर जर कोणी रागावले असेल तर त्याचा राग तुम्ही दूर करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक नाते अधिक दृढ होईल. व्यवसायात अधिक नफा होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.सगळी कामे वेळेवर होतील. समाजात सन्मान वाढेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
मिथुन – परदेश गमनाचा योग संभवतो.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी निगडीत असलेल्यांचा अनुकूल असा काळ आहे.शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना सुखदवार्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजन करुन काम कराल तर यशस्वी व्हाल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. घेण्यादेण्याच्या व्यवहारात सावधान. परदेश गमनाचा योग संभवतो
कर्क – कोणाला उधार देऊ नका
आज कोणीही तुमच्याकडून पैसे मागितले तरी उधार देऊ नका. कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता नाही. व्यवसायातही उतार- चढ अशी परिस्थिती राहील. आर्थिक स्थितीत बिघाड होईल.आत्मविश्वास कमी होईल. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामे पूर्ण होतील. कोर्ट-कचेरीतल्या केसेस सुटतील.आरोग्याची काळजी घ्या.
सिंह – खर्चावर नियंत्रण ठेवा
आरोग्य सुधारेल.थोडे फ्रेश वाटण्यासाठी थोडा फेरफटका मारुन या. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. व्यवसायात नवीन ओळखीचा फायदा होईल. नोकरी संदर्भात बाहेर जाण्याचे योग संभवतात. घेण्यादेण्याच्या व्यवहारात सावध राहा. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कामात प्रगती होईल.
कन्या – वरिष्ठांसोबत वाद वाढेल
जोडीदार आणि तुमच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण राहील. त्याच्या भावना समजून घ्या.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. आवश्यक कामे वेळेवर पूर्ण करा. आळस झटका. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – घरात मंगलकार्य होणार आहे
आज तुमच्या उत्पन्न क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायातील एखादी नवी योजना सफल होईल. घरात मंगलकार्याची योजना बनणार आहे. समाजात सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील.गरजूंना मदत केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
वृश्चिक – कामात सुधारणा करा
आज तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होई शकतो.आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे. कामात सुधारणा केलीत तर तुम्हाला त्यातून चांगला फायदा होऊ शकतो.अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. राजकारणात जबाबदारी वाढेल. वाहन चालवताना सावधान
धनु – विवाहाचे योग आहेत
अविवाहितांसाठी अगदी योग्य काळ आहे. विवाहाचे योग जुळू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज तुम्ही कामात खूप व्यग्र राहाल. सहकाऱ्यांची मदत मिळेल.कुठून तरी दु:खद बातमी येण्याची शक्यता. अचानक प्रवासाचे योग संभवतात. मन बैचेन राहील.
मकर- नोकरीत अस्थिरता राहील
आज व्यापारात मंदी राहील. नोकरीमध्ये अस्थिरता असेल. वरिष्ठांशी वाद वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तांत्रिक शिक्षणात तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा राहील. घेण्या- देण्यात संतुलन राहील. बिघडलेली काम नीट होतील.
हेही वाचा
तुमच्या मित्र मैत्रिणीही वागतात त्यांच्या राशीप्रमाणे, वाचा काय आहेत राशींची वैशिष्ट्ये
राशीनुसार काय आहे तुमचा लकी नंबर
प्रत्येक राशीची प्रेम करण्याची पदधत असते वेगळी,वाचा नेमकी कशी