मेष : धनलाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. देण्याघेण्याचे व्यवहार मार्गी लागतील. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करु शकता. रचनात्मक कामांमध्ये यशस्वी व्हाल.
कुंभ : कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील
कोणत्यातरी जुन्या नात्याच्या प्रती तुमच्यामध्ये काही भावना उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जुन्या मित्रांच्या सहयोगामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत झालेला तणाव निवळेल.
मीन: पदोन्नतिमध्ये अडचणी येण्याची शक्यता
पदोन्नतिमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबातून भावनिक आधार मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ: विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष उडेल
विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून उडू शकते. व्यावसायिक यात्रेदरम्यान सावध राहा. कोणत्यातरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वादापासून दूर राहा. वृद्धांच्या मदतीमुळे काही जुन्या अडचणी संपण्याची शक्यता आहे.
मिथुन: कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो
जोडीदाराला कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायिक परिस्थिती संतोषजनक असेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नव्या संपर्कापासून सावध राहा. सामाजिक कामांमधील सहभाग वाढू शकतो.
कर्क : जोडीदारासोबत घालवाल चांगला वेळ
जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. मुलांच्या मदतीने तुमच्या काही समस्या सुटतील. भूतकाळातील तुमच्या कमतरता दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायातील फायद्यासाठी तुम्ही तडजोड करु शकता. घेण्यादेण्याचे व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : विद्यार्थ्यांना मिळेल मेहनतीचे फळ
विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळेल. मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नव्या योजना तुम्हाला प्रोत्साहीत करतील. राजकारणात पुढे जाण्याच्या संधी मिळतील.
कन्या : पैशांच्या समस्या करतील चिंतातूर
पैशांसंदर्भात कोणतेही पाऊल उचलू नका. पैशांसंदर्भात तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्यापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी कार्यकुशलता ठेवा.जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.
तुळ: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील
जीवनशैली बदलल्यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्वास वाढेल. बिघडलेली काम मार्गी लागतील. रचनात्मक कामांमध्ये आवड निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामांमुळे प्रभावित होतील.
वृश्चिक: प्रेमामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता
प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.व्यवसायात तणाव वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. गाडी चालवताना सावध राहा. धार्मिक कामांमध्ये रुचि वाढेल.
धनु :धन लाभ होण्याची शक्यता
मित्रांकडून काही तरी भेट मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचे स्थान उंचावणार आहे. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल
मकर : आरोग्याची काळजी घेण्याची गरज
आरोग्यासंदर्भातील तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यास चांगला काळ आहे.अनावश्यक वादापासून दूर राहा.जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. प्रवासाचे योग संभावतात.
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)