ADVERTISEMENT
home / भविष्य
26 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

26 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या लोकांना धनलाभाचा योग

मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता 

आज विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी आळसाचा त्याग करावा लागेल. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा केल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या बातमीमुळे मनात शंका निर्माण होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

कुंभ –  विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात मन रमणार नाही. करिअरची नवीन आणि उत्तम संधी मिळण्यासाठी कार्यप्रणाली आणि व्यवहारात बदल करा. कौटुंबिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले धन मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

मीन – महागडी भेटवस्तू मिळेल

आज आई-वडील आणि सासरच्या लोकांतर्फे महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. चल अचल संपत्ती खरेदीचा योग आहे. व्यवसायासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. 

वृषभ – आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज तुमचे आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे. नात्यात गोडपणा येण्याची शक्यता आहे. देणी – घेणी सांभाळून करा.

ADVERTISEMENT

मिथुन – अधिकारी तुमच्या बाजूने असतील

आज तुमचे भाग्य तुमच्या बाजूने आहे. अधिकारी तुमचे म्हणणे ऐकतील. बिघडलेली कामे सुधारणार आहेत. कुटुंबासोबत चांगला काळ घालवाल. प्रतिष्ठित व्यक्तीसोबत भेटीगाठी होतील. 

कर्क – नवीन संधी मिळेल

आज करिअरबाबत एखादी नवी  संधी मिळेल. व्यवसायात रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी आळस सोडून अभ्यास करावा. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल. 

ADVERTISEMENT

सिंह – मुलांवर विनाकारण पैसा खर्च होईल

आज सेलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करू नका. कारण नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. मुलांवर विनाकारण पैसे खर्च होतील. कोर्ट कचेरीत अडथळे येण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

कन्या – आरोग्य सुधारेल

आज तुम्हाला फ्रेश वाटेल. आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. 

ADVERTISEMENT

 

तूळ – कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमची एखाद्याची निर्माण झालेली खास जवळीक तुमच्या कुटुंबियांना आवडणार नाही. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. वाहन चालवताना सावध राहा. मित्रांशी भेट सुखकारक असेल. 

वृश्चिक – जुने आजारपण वर येण्याची शक्यता

ADVERTISEMENT

आज तुमचा जुना रोग पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. 

धनु – मित्रांकडून भेटवस्तू मिळतील

आज आयात-निर्यातीच्या लोकांसाठी लाभदायक काळ आहे. प्रियकराकडून सरप्राईझ गिफ्ट मिळू शकते. आधुनिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ आणि प्रेम मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

मकर – प्रेमाचा शोध पूर्ण होईल

ADVERTISEMENT

आज तुम्हाला खरे प्रेम मिळणार आहे. जुने वाद मिटणार आहेत. आत्मविश्वासाने कोणत्याही समस्येचे निराकरण कराल. जोडीदाराशी नाते मजबूत होणार आहे. आज एखादी गोड बातमी मिळेल. राजकारणातील रस वाढणार आहे. 

अधिक  वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

ADVERTISEMENT

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

24 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT