मेष : मित्र आनंद देतील
आज तुम्हाला मित्रांकडून आनंद प्राप्त होणार आहे. संकटात काळात मित्रच धावून येतात, याचा अनुभव येईल. एखाद्या बद्दल गैरसमजही आज होऊ शकतो. कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगती होण्याचे योग आहेत. म्हणून आपल्या कल्पनांना आज मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीवचे धाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, हे लक्षात ठेवावे.
कुंभ : अगोदर श्रम नंतर भाग्य
कधी कधी भाग्य आपली परिक्षा घेत असतं. त्यामुळे परिश्रम करुनही यश मिळत नसेल तर निराश होऊ नका. परिश्रम करीत राहा. त्यानंतरच तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. स्वत:वर विश्वास ठेवा. इच्छित कार्याला उशिर होऊ शकतो. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. आज तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार आहे.
मीन : सुखशांतीचे वातावरण
आज तुमची सुखशांतीच्या वातावरणाचा अनुभव करणार आहात. त्यामुळे मानसिक शांतताही लाभेल. आज चिंतन करण्यावर भर द्या. एखाद्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडल्यामुळे देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. देव तारी त्याला कोण मारीचा अनुभव मिळेल. लेखक, कवी मंडळीसाठी आज यशाचा दिवस असून त्यांच्या लेखन कार्याला यश मिळून लौकिकातही भर पडणार आहे
वृषभ : विरोध होईल
आज तुम्हाला अनोळखी लोकांनाकडून आकस्मिकरीत्या विरोध होऊ शकतो. त्यामुळे लक्षापासून थोडे विचलित व्हाल. आत्मवि·ाास कमी राहिल. आज प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रवास टाळा. अमर्याद सहनशीलता व व उत्साह या दोन्ही गोष्टींचा आजचा तुमचा दिवस परिपूर्ण असेल.
मिथुन : प्रेमवीरांसाठी उत्तम
प्रेमवीरांसाठी आजचा दिवस उत्तम व आनंददायी असा आहे. कारण आज प्रेयसी/प्रियकरांशी संपर्क होऊ शकतो. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे जे करायचे आहे, ते सर्व आज करण्यावर भर द्या. अपूर्ण असलेले एखादे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. तुम्हाला यश नक्की मिळेल.
कर्क : शत्रू वरचढ होतील
आज तुमचे शत्रू वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराशा घेरुन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मात्र एखाद्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडल्याने आपल्यावर ईश्वराचा आशीर्वाद असल्याची भावना मनात दाटून येईल. आज थोडीही बेशिस्त नको. नाही तर एक ना धह भराभर चिंध्या अशी तुमची अवस्था होऊ शकते.
सिंह : आत्मविश्वास वाढेल
आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज तुम्ही शत्रुंना नामोहरम करणार आहात. त्यामुळे आत्मविश्वासही वाढणार आहे. मात्र उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. म्हणून आत्मविश्वासाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा. वाहतूकीचे नियम पाळा. स्वत:ची काळजी घ्या.
कन्या : नवीन ओळखी होतील
आज तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो. त्यामुळे फक्त आपल्यालाच सर्वकाही मिळेल हा अट्टहास नकोच. सायंकाळपर्यंत ज्याची तुम्ही कल्पनाही केली असेल असा एखादा आकस्मिक आनंद प्राप्त होईल.
तूळ : वास्तूतून लाभ
आज तुमला वास्तूतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न तुम्ही वाढवले पाहिजेत. आज प्रवासाचेही योग असून त्यातूनही तुम्हाला संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा आनंद वाढीस लागेल. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. नाही तर नंतर पश्चाताप करुन काहीच उपयोग होणार नाही.
वृश्चिक : शत्रूंचा पराभव
आज तुम्हाला संधी आहे शत्रूंचा पराभव करण्याची. त्यामुळे तिला सोडू नका. आत्मवि·ाासाच्या वाढीसाठी ते तुम्हाला पूरक ठरेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मनाला मनस्वी आनंद प्राप्त होईल. मानसिक सुखशांतीचे वातावरण राहिल. फक्त बोलतांना मुद्देसुदच बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला, असं आज करु नका.
धनु : सामंजस्य वाढेल
आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असून आज तुमचे ओळखीच्या लोकांबरोबर सामंजस्य वाढणार आहे. त्याचा उपयोग संबंध सुधरविण्यासाठी, ते अधिक दृढ करण्यासाठी करुन घ्या. आज तुम्ही आध्यात्म्यात रममाण होणार आहात. कुणाविषयी मनात वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. जळात राहून माशांशी वैर करु नये.
मकर : वास्तूवर खर्च
आज तुम्ही आनंदात वास्तूवर खर्च करणार आहात. ज्याचा आनंद संपूर्ण परिवाराला होणार आहे. प्रयत्न करुनही भाग्याची साथ नसेल, अपेक्षित यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन बघा. भाग्यही आपोआप बदलेल. बोलतांना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. तोलून मापुनच बोलणे आज आपल्या हिताचे आहे.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र