ADVERTISEMENT
home / भविष्य
27 जानवारी 2019 चं राशीफळ

27 जानवारी 2019 चं राशीफळ

मेष – अतिविचार घातक

चिंतन व चिंता या दोन वेळेस व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर अतिविचार करीत असतो. चिंतनामधून त्याला मार्ग काढायचा असतो तर मनाला भिती वाटत असल्याने चिंतेचा जन्म होतो. म्हणून अतिविचार हे घातक असतात. चिंतनाचे रुपांतर कधीच चिंतेत झाले नाही पाहिजे. भित्यापोटी ब्रम्हराक्षस ही सत्यता लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका. आपल्याला ज्या गोष्टींचा छंद किंवा आवड असेल त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनासाठी वेळकाढा. चालायला सुरुवात करा. भाग्य आपोआप तुमच्या मागे येईल. प्रयत्न केल्याशिवाय परमे·ाराची प्राप्ती होऊ शकत नाही. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पर्यायी साधन तयार करा.

कुंभ – अनोळखी लोकांचा विरोध

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल, त्यात कुठल्याच अडचणी येणार नाहीत, कोणताच विरोध होणार नाही अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आज तुम्हाला अनोळखी लोकांकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे विचलित होऊ नका. आपले प्रयत्न चुकीचे असतील तर त्यांची दिशा बदला. म्हणजे चुक वेळीच सुधारेल. आज एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे सकारात्मकता अंगी बाळगुन त्यांचा पुरेपुरे आनंद घ्या. आज वेळ मिळत आहे, मनसोक्त जगुन घ्या. जेवढा आनंद पदरात पाडता येईल तेवढा पाडून घ्या. वैवाहिक जीवनातही आज विविध रंग आपल्याला अनुभवायला मिळतील.

ADVERTISEMENT

मीन – आरोग्याकडे लक्ष द्या

आपल्या राशीला चंद्र आठवा आहे. जो आरोग्याच्या समस्या उत्पन्न करीत असतो. त्यामुळे आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. छोटी दुखणीही जास्त त्रास देऊ शकतात. म्हणून जागरुक राहा. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत होईल. आज तुम्ही जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागणार आहात, वेळ देणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहास सोडून सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो ही सत्यतालक्षात घ्या. जास्तीचा हट्ट सोडून जे पदरात पडतंय ते पाडून घ्या. आज सासुरवाडीकडून लाभ मिळू शकतो. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण राहिल.

वृषभ – चिंतन करा, चिंता नको

कुठल्याही गोष्टींवर केले जाणारे चिंतन हे एखाद्या समस्येवर नवीन मार्ग मिळवून देत असते. तर चिंता ही मनामध्ये भितीचे वातावरण तयार करते. चिंतनाद्वारे समस्येतून मुक्ती मिळते तर चिंतेद्वारे समस्या अधिक वाढत जाते. त्यामुळे चिंतन करा, चिंता नको, हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. शक्यतोवर आज कुणावरही विसंबुन राहू नका. अत्यावश्यक असलेली कामे स्वत:पूर्ण करा. नाही तर पश्चातापाची वेळ येऊ शकते. इच्छित कार्य साध्य व्हायलाउशिर लागू शकतो किंवा जास्त परिश्रम करावे लागू शकतात. म्हणून विचलित होऊ नका. प्रयत्न करीत राहा. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधणे बरोबर नाही.

ADVERTISEMENT

मिथुन – आशीर्वाद मिळवावेत

थोरमोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही नेहमीच चांगली बाब असते. त्यामुळे आपल्या अंगी नम्रता हा गुण तर येतोच शिवाय मनाशांतीचाही अनुभव मिळत असतो. आशीर्वाद कधीही व्यर्थ जास्त नाहीत. होऊ शकतं मार्गदर्शनातून तुम्हाला नवीन मार्गही सापडू शकतात. म्हणून आज तुम्ही आशीर्वाद मिळविण्यावर भर द्या. जे लोक कुटुंबाचे प्रमुख असतील, आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणारे असतील अशा कुटुंबवत्सल लोकांचा आज अर्थलाभ होऊ शकतो. तो योग्य पद्धतीने मिळवून त्याचा आनंद परिवारासोबत वाटण्याचा प्रयत्न करा. आरोग्य नरम-गरमच राहिल. त्यामुळे आज प्रकृतीला जपणे आपल्या हिताचे राहिल. स्वत:च्या भरभराटीवर, नफ्यावर लक्ष द्या. मात्र हे करीत असतांना लक्षात घ्या, की थेंबे थेंबेच तळेसाचे!

कर्क – अस्वस्थता जाणवेल

आपल्या राशीला चौथा असलेला चंद्र तुमच्या मनाला अस्वस्थता देऊ शकतो. त्यामुळे मन विचलित होईल.  ैधाडस करण्याची इच्छा होणार नाही. आत्मवि·ाासही कमी राहिल. त्यामुळे कोणत्याच महत्त्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेऊ नका. आहारा संबंधीचे नियम पाळा. नाही तर अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण जर त्यापैकी एक असाल तर आज शक्यतो कुणावर टिका टिप्पणी करण्याचे टाळा. वरकरणी कनवाळू व आतुन कठोर अशा आतल्याकाठीच्या लोकांपासून सावध राहा. ते तुम्हाला फसवू किंवा गैरफायदा घेऊ शकतात.

ADVERTISEMENT

सिंह – कागदपत्रे सांभाळा

महत्त्वाची कागदपत्रे ही रोज लागत नसतात. म्हणून त्याकडे महत्त्वाची असूनही आपले दुर्लक्ष होत असते. कुठेतरी अडगडीत ते ठेवले जातात व जेव्हा काम पडतं तेव्हा ते सापडत नाहीत. अशी आपली गत होऊ नये म्हणून ते सांभाळून ठेवा. ते गहाळ होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. आज आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करा. जीवनामध्ये धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन कार्य करीत राहा. वरकरणी कठोर व आतुन कनवाळू असा स्वभाव जर तुमचा असेल तर सावधान! आज लोक तुमच्या भावनांशी खेळू शकतात.

कन्या – संपत्तीचा वाद मिटेल

आपल्या घरात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर तो आज मिटू शकतो. त्यामुळे आज त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज थोडासा तणावही जाणवले. तो घालविण्यासाठी संगीत ऐका किंवा ज्या गोष्टीत आपल्याला रसआहे तिला करण्यावर भर द्या. मनोरंजनासाठी वेळ काढा. सत्याची कास सोडू नका. असत्य हे एके दिवशी तोंडघशी पडतंच. त्यामुळे त्याची आजच साथ सोडलेली बरी असते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर आपल्याला सोसावेच लागेल. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आता वाट्याला येऊ शकतात. म्हणून आलिया भोगासी असावे सादर!

ADVERTISEMENT

तूळ – जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न

कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी जबाबदा-या आपल्याला टाळता येत नाहीत. तसे केले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतातच. कारण जबाबदारी ही फक्त तात्पुरती टाळता येते. कायमस्वरुपी तिला टाळणं शक्य नाही. आज तुम्ही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कराल. संवाद साधतांना तो अचुक असा साधा. नाही तर वाद निर्माण होऊ शकतो. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खांचा भागाकार करीत जगावे लागते, ही बाब लक्षात घ्या. आर्थिक ओढतान आज सहन करावी लागू शकते. त्यामुळे मन विचलित होऊ शकतं. दात आहेत तर चने नाहीत आणि चने आहेत तर दात नाही याचाही अनुभव आज तुम्हाला येऊ शकतो.

वृश्चिक – खर्च वाढेल

आपल्या राशीला चंद्र बारावा आहे. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढू शकते. जे तुम्ही टाळू नाही शकत. मात्र त्याला कमी निश्चितपणे करु शकतात. म्हणून अवास्तव खर्चाला कात्री लावणेच बरे. तसेच खर्च करीत असतांना आपल्या उत्पन्नाकडेही लक्ष ठेवावे. झटपट काहीही मिळत नाही, ही सत्यता लक्षात घेऊन झटपट पैसे मिळविण्याच्या मागे लागू नका. कोणतीही कृती करण्यापूर्वी चारदा विचार करा. नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आज तुम्ही संकटातून बाहेर पडणार आहात. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हरकत नाही. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीची अनुभूती आज तुम्हाला लाभू शकते. म्हणून विचार सकारात्मक ठेवा. आत्मवि·ाास असू द्या.

ADVERTISEMENT

 धनु – दुखणे वाढेल

सांधेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आज तुमचे दुखणे वाढू शकते. तुम्हाला काही पथ्य सांगितलेले असतील तर ते आज अगदी तंतोतंत पाळण्यावर भर द्या. हलगर्जीपणा करु नका. नाही तर परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. फुटकच्या गप्पा-टप्पा आज नकोत. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी आपली गत होणार नाही याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आज तुम्ही कामे टाळण्याचा, जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कराल. न कत्र्याचा वार शनिवार असं तुमच्या बाबतीत व्हायला नको. म्हणून आज काही तरी करा. जबाबदारीपासून पळ काढू नका.

मकर – आरोग्याच्या तक्रारी

आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण एखादे जुने दुखणे तोंड वर काढू शकते. विशेषत: ज्यांना संधीवाताचा त्रास आहे त्यांनी तर आज आपली विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही काही पथ्य पाळत असाल तर ते आज अगदी तंतोतंत पाळा. नाही तर त्रास वाढू शकतो. कर्मचारी वर्गासाठी आज आनंदाचा दिवस राहिल. कारण आज पात्र असलेल्या कर्मचा-यांना बढती मिळू शकते. कार्यासह अधिकारातही वाढ होऊ शकते. टिका व तक्रार या दोन गोष्टींमध्ये वेळ दवडू नका. आपल्या ध्येयावर लक्ष द्या. पदरी पडले अन् पवित्र झाले हा भाव मनी धरा. भावंडांशी मतभेद नको. त्यांच्याशी सामंजस्याने वागा. एका हाताने टाळी वाजत नाहीत ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे.

ADVERTISEMENT

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

 

25 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT