मेष – कौटुंबिक वाद होण्याची शक्यता
कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एखादा जुना वाद वर येण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. घरातील वृद्धांची काळजी घ्या.
कुंभ – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
आज तुमच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्ज घेण्याची गरज भासेल. व्यवसायात सक्रिय आणि कामात दक्ष राहण्याची गरज आहे.
मीन- दीर्घ आजारपणातून सुटका होईल
आज तुम्हाला जुन्या आजारातून आराम मिळणार आहे. खाण्या-पिण्याबाबत दक्ष रहा. विचार करून काम करा. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका. जमा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ – जोडीदाराची तब्येत खराब राहील
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग होण्याची शक्यता आहे. कामातील अडचणी कमी होतील. धार्मिक कार्यातील रस वाढेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या कामात साध रहा.
मिथुन – महागडे सामान खरेदी कराल
आज तुम्हाला जुनी प्रॉपर्टी वारसाहक्काने मिळण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील. आयात निर्यातीच्या व्यवसायात फायदा होईल. आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क – अविवाहितांसाठी अनुकूल काळ आहे
प्रियकराच्या दिशेने तुमची ओढ वाढेल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मुलांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी कमी होतील. सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
सिंह – नकारात्मक विचारांपासून दूर रहा
आज तुम्हाला नवीन कामासाठी भटकावे लागेल. विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार करू नका. कामाच्या ठिकाणी घाईघाईत काम केल्याने चुका होऊ शकतात. आत्मविश्वास कमी असेल. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल.
कन्या – रखडलेले पैसे परत मिळतील
आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. एखादा नवा व्यवसाय सुरू कराल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक कामासाठी प्रवास करावा लागेल. देणी घेणी सांभाळून करा.
तूळ – अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला सावधपणे काम करावं लागेल. अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. विनाकारण वाद घालू नका. व्यवसायात घाईघाईत आणि भावनेच्या आहारी जावून निर्णय घेऊ नका. शिक्षणासाठी घरापासून दूर जावं लागेल.
वृश्चिक – पोटाच्या समस्या कमी होतील
पोटदुखीने तुम्ही आज त्रस्त व्हाल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. तरूणांना मनासारखे काम मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात सावध रहा. राजकारणात कामाचा ताण वाढेल.
धनु – पोटदुखीचा त्रास होईल
एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश आणि मानसन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
व्यवसायातील नवीन योजना वाढतील
आज तुमची सर्व कामं सहज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची गरज आहे. व्यवसायात नवीन योजना आखाल. एखादे जुने आणि रखडलेले काम थोडेसे पैसे खर्च करून पूर्ण कराल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात