मेष : काम पूर्ण होईल
अधिकारी वर्गाच्या हातात आपले एखादे काम अडकलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले याचा अनुभव येईल. आज आत्मविश्वास कमी राहिल. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचे धाडस आज शक्यतोवर करु नका. आर्थिक बाजु बळकट राहिल.
कुंभ : सामाजिक कार्यात सहभाग
आपली मुले आज सामाजिक कार्यात सहभागी होतील. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्याचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल तर आज त्यासाठी प्रयत्न वाढवा. आज यश मिळू शकतं. सायंकाळपर्यंत आज एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होऊ शकतो. त्याचा आनंद अधिक वाढविण्यासाठी सज्ज राहा.
मीन : आनंदाचे वातावरण
घरात आज आनंदाचे वातावरण राहिल. संपूर्ण परिवारासह त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तडका-फडकी कुणावरही शेरेबाजी करु नका. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्याने कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. आलीया भोगासी असावे सादर. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज वाट्याला येऊ शकतात.
वृषभ : संधीचा लाभ घ्या
नोकरदार मंडळीसह व्यावसायिकांसाठीही आज लाभाचा दिवस आहे. कारण आज तुम्हाला संधी मिळणार आहेत. त्या ओळखून पुरेपुर लाभ घ्यायला विसरु नका. जसा देश तसा वेश असतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून फसवणूकीची शक्यता आहे. त्यामुळे कुणावरही विसंबून राहू नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी आज ग्रहमान अनुकूल आहेत.
मिथुन : आरोग्य चांगले
आज तुमचे आरोग्य चांगले राहणार असून दिवसभर ताजेतवाणे राहाल. त्यामुळे मनही प्रसन्न राहिल. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती शक्य आहे. त्यामुळे आपल्या संकल्पनांना आज मूर्त रुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून परिश्रम करायला चुकू नका. दिव्यातील राक्षस तुमच्यासाठी हात जोडू उभा आहे.
कर्क : कष्टांचे सार्थक
कष्ट कधीही वाया जात नाहीत. पूर्वी घेदतलेले कष्ट सार्थकी लागण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे प्रसन्नता व आत्मविश्वास दोन्हीही वाढलेले असतील. गृहिणींना मात्र आज आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू शकतो. किचनमधले नियोजन कोलमंडलेले असेल. आज तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या.
सिंह : कंटाळा येईल
आज आळस येऊन तुम्ही कंटाळा करणार आहात. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. लहान भावडांची काळजी घ्या. त्यांना आज दुखापत होण्याची शक्यता आहे. शॉपिंग करायला जात असाल तर आधी आपला खिसा तपासून पाहा व त्यानुसारच शॉपिंग करा. अती तिथे माती होत असते, म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका.
कन्या : वृद्धी होईल
आज तुमचा पराक्रम गाजविण्याचा दिवस आहे. आज पराक्रम व आरोग्यामध््येही वृद्धी होणार आहे. त्यामुळे प्रसन्नता व आत्मविश्वास या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण असाल. कुणाविषयी मनात वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. अनुभवातून शहाणपण वाढविण्याचा आजचा दिवस आहे.
तूळ : सामाजिक कार्यात सहभाग
आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्रत वैकल्याचे पालन करा. त्यातून मनशांतीचा अनुभव येईल. आत्मिक समाधान लाभेल. सहका-याकडून आपल्याला आज मदतीचा हात मिळू शकतो. त्यामुळे परिस्थितीतून बाहेर पडू शकाल. कामे पूर्ण होऊ शकतील. संबंधांमध्ये अधिक दृढता निर्माण होईल.
वृश्चिक : विद्यार्थ्यांना लाभ
आजचा दिवस विशेषत: स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यासाठी उत्तम आहे. त्यांना आज लाभ मिळू शकातो. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस आनंदाचा होऊ शकतो. आज आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. काम करीत असतांना त्यातील महत्त्वाचे कुठले हे लक्षात घेऊन ते पूर्ण करण्याला प्राधान्य द्या.
धनु : अनुकूल वातावरण
व्यावसायिकांसाठी आज वृद्धीचा दिवस आहे. कारण आज व्यवसायासाठी अनुकूल असे वातावरण राहून संधी प्राप्त होणार आहेत. त्यांचा लाभ घ्या. अनामिक शत्रुपासून सावध राहावे लागेल. अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधने तयार करण्यावर भर द्या.
मकर : कष्ट सार्थकी लागतील
कष्ट सार्थकी लागण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे चांगुलपणावरील आपला विश्वास अधिक दृढ होणार आहे. अब पछताये क्या होत जब चिडीया चुग गई खेत. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज संधी मिळत आहे, तिचा लाभ करुन घ्या. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधने तयार करण्यावर भर द्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद