मेष – मतभेद टाळा
आज तुमचे वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पण रागावर नियंत्रण ठेवा आणि मतभेद टाळा. असं कोणतंही काम करू नका ज्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. राजकारणातील सक्रियता वाढेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
कुंभ – कर्ज घेणं टाळा
आज तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. पण तरीही कर्ज घेणं टाळा. अनावश्यक वाद-विवादांपासून दूर राहा. कुटुंबाकडून तुम्हाला आधार मिळेल. जोडीदार तुमच्या समस्या समजून घेईल आणि प्रेमाने तुमच्या शंकाही दूर करेल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
मीन- जोडीदाराच्या आरोग्याची चिंता नको
जोडीदाराच्या आरोग्यात आज सुधारणा होईल, त्यामुळे तुम्हाला भावनिकरित्या खूप बरं वाटेल. वाढत्या खर्चामुले तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याबाबत विचार कराल. व्यवसायासंबंधीच्या यात्रेमुळे फायदा होईल. उत्पन्नाची नवीन साधन मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मदत मिळेल.
वृषभ – हवामानाचा परिणाम तब्येतीवर होईल
दिवसभर धावपळ केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दुर्लक्ष करू नका. जोडीदारांसोबत तुमचं नातं अजून दृढ होईल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणात चांगली संधी मिळेल. नोकरीमध्ये बदलीचे संकेत आहेत. अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल.
मिथुन – अचानक धनलाभ होण्याचा योग
आज तुम्हाला अचानक धनलाभाचा योग असल्याने मन प्रसन्न राहील. घरातील सुखवस्तूंमध्ये वाढ होईल. कुटुंबासोबत तुम्ही आनंद साजरा कराल. शुभ कार्यांना उपस्थिती लावाल. खाण्यापिण्यात काळजी घ्या. रचनात्मक कार्यांमध्ये रस घ्याल.
कर्क – कुटुंबात राहील आनंदी वातावरण
आज घरातील ज्येष्ठांच्या मदतीने कुटुंबातील समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. ओळखीच्या लोकांच्या मदतीने तुमचा खर्च होऊन कामही चांगलं होईल. सामाजिक कार्यात तुमचा रस वाढेल. नोकरीमध्ये तुम्हाला अतिरिक्त जवाबदाऱ्या दिल्या जातील.
सिंह – लक्ष्य प्राप्तीसाठी करावी लागेल मेहनत
लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. नव्यानेच ओळख झालेल्या लोकांपासून सावधान राहा. रचनात्मक कार्यात तुम्हाला यश मिळेल. अडकलेली काम पूर्ण होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पार्टनरसोबत प्रेम आणि रोमँटीक नातं कायम राहील.
कन्या – मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल
आज तुमचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. आईवडिलांकडून कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील करार पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होईल. मनोधैर्य वाढेल. पार्टनरसोबतचे तुमचे संबंध अजून मजबूत होतील.
तुळ – व्यवसायात अडचणींना सामोरं जावं लागेल
लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला आज कष्ट घ्यावे लागतील. व्यवसायांमध्ये तुम्हाला काही प्रोब्लेम्स जाणवतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये मधुरता येईल. पण खर्चावर मात्र नियंत्रण ठेवायला विसरू नका. मनोबल कमी होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक – आरोग्याकडे लक्ष द्या
आज तुम्हाला हातापायाच्या दुखण्यामुळे त्रास होईल. पूर्ण दिवस शारीरिक थकवा जाणवेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर त्रास होईल. नाहक धावपळ करावी लागणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नात अजून दृढ होईल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
धनु – संततीच्या बाबतीत मिळेल खूशखबर
आज तुमचा भाग्योदयाचा दिवस आहे. संततीबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमचं मनोधैर्य वाढेल. आईवडिलांचं सानिध्य आणि मदत मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला जवाबदारीची काम मिळतील. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहेत.
मकर- नवीन नोकरीचा शोध होईल पूर्ण
जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध आज पूर्ण होईल. तुमच्यातील हुशारी आणि व्यवहार कौशल्यामुळे आज तुम्हाला बरंच काही मिळवता येईल. विरोधक माघार घेतील. वैवाहीक जीवनात आनंद आणि उत्साह कायम राहील. भावनात्मकरित्या आज तुम्हाला खूप बरं वाटेल.
हेही वाचा –
वार्षिक भविष्य मेष (Aries) राशी
वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी