मेष : व्यवसायात यश मिळेल
भाग्याचा उदय होईल, अशी संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असतील. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील. आत्मविश्वास आणि सामाजिक सन्मानात वाढ होईल.
कुंभ : प्रकृतीच्या समस्या
जोडीदाराची प्रकृती ठीक नसल्यानं मन विचलित होईल. व्यवसाय किंवा नोकरीसंबंधित विचारपूर्वक निर्णय घ्या. आपली रखडलेली काम पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती ठीक होईल.
मीन : विवाहातील अडचणी दूर होतील
मनातील गोष्ट जाहीररित्या सांगण्यात यश मिळेल. विवाहातील अडचणी दूर होतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. वाहन चालवताना सतर्क राहा. पार्टनरसोबत सामाजिक समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आर्थिक नुकसान होण्याची भीती
व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती कायम असेल. प्रॉपर्टीच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आईवडिलांकडून भावनिक सहकार्य मिळेल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.
मिथुन : आईचे आरोग्य सुधारेल
आईचे आरोग्य सुधारेल. आपला दिनक्रम नियमित सुरू ठेवा. कुटुंबात समृद्धी असेल. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. महत्त्वाची रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.
(वाचा : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’)
कर्क : जोडीदारासोबत वाद वाढण्याची शक्यता
जोडीदारासोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध प्रवास घडण्याची शक्यता.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद निर्माण होतील. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत पदक मिळण्याची शक्यता आहे.
सिंह : दातदुखीमुळे त्रास होण्याची शक्यता
दातांच्या दुखण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. भविष्यातील चिंतेमुळे नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. इतरांकडून सहकार्य घेण्यात तुम्हाला यश मिळेल.
कन्या : कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता
कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन कंत्राटे मिळण्याची शक्यता. जोडीदारासह भटकंती कार्यक्रम आखू शकता. सामाजिक आदर आणि संपत्तीत वाढ होईल.
(वाचा : आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का)
तूळ : अविवाहितांसाठी अनुकूल वेळ
अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखला जाईल. जोडीदाराच्या माध्यमातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय घेणं आज टाळा.
वृश्चिक : चांगली संधी गमावण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगली संधी गमावली जाण्याची शक्यता आहे. कमीत कमी वेळेत जास्त धन कमावण्याच्या योजनांवर विश्वास ठेवू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.
धनु : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील
नशिबानं तुम्हाला साथ देण्यास आरंभ केला आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मन प्रसन्न राहील. आनंददायी प्रवासाचा योग आहे. प्रेमसंबंध चांगले राहतील.
(वाचा : राशीनुसार निवडा तुमचे करिअर)
मकर : नवीन कामाचा आरंभ टाळा
नवीन कामाचा आरंभ करणं आजपासून टाळा. अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांसोबत मतभेद होतील. अनावश्यक वादापासून दूर राहा. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. अपत्याकडून सुखद वार्ता ऐकण्यास मिळतील. प्रवासाचा योग आहे.