ADVERTISEMENT
home / भविष्य
28 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ

28 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ

मेष – दिखावा करण्याच्या प्रयत्नात कर्जबाजारी व्हाल

आज जास्त मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखादी चांगली संधी गमावणार आहात. दिखावा करण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वादविवादांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 

कुंभ – विवाहाबाबत खुशखबर मिळेल

आज अविवाहित लोकांना विवाहाबाबत खुशखबर मिळेल. जुने संबंध पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 

ADVERTISEMENT

मीन – यश मिळण्याचा योग आहे

आज विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या गुणांची प्रशंसा होईल. पदोन्नतीची संधी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. विरोधक नमणार आहेत. 

वृषभ – आरोग्य चांगले राहील

नियमित व्यायामामुळे तुमची तब्येत ठीक राहील. दिवसभर फ्रेश वाटेल. धुर्त लोकांपासून सावध राहा. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. रचनात्मक कार्यात मन रमेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

ADVERTISEMENT

मिथुन – मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता

आज तुमचा मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. जवळच्या लोकांना वेळ द्या. तणाव वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून दूर राहा. एखादी चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक प्रवास घडेल. 

कर्क – पोटाच्या समस्या जाणवतील

आज तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादामध्ये तुमची बाजू वरचढ असेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. आज रोमॅंटिक दिवस आहे.

ADVERTISEMENT

सिंह – आर्थिक समस्या संपणार आहेत

आज तुम्ही एखाद्या नव्या कामाला सुरूवात करणार आहात. आर्थिक समस्या संपणार आहेत. राजकारणातील लोकांना फायदा होणार आहे. संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होतील. 

कन्या – एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणार आहात

आज तुमच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी आणि उत्साहाचे असेल. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. विरोधक नमणार आहेत. उत्पन्नात समतोल राखा. जोखिमेची कामे घेऊ नका. वाहन चालवताना सावध राहा. 

ADVERTISEMENT

तूळ – अधिकाऱ्यांचे मतभेद वाढणार आहेत

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी मतभेद वाढणार आहेत. घाईघाईत कोणतेही काम करू नका. राजकारणात बिझी राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढणार आहे. जोडीदारासोबत नातेसंबंध मजबूत होतील. 

 

वृश्चिक – रखडलेले धन मिळणार आहे

ADVERTISEMENT

आज रखडलेले पैसे परत मिळतील. देण्या घेण्याच्या समस्या कमी होतील. कौटुंबित सुख सुविधांमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळून करा. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. 

धनु – करिअरमध्ये समस्या येतील

कामाच्या ठिकाणी समस्या येतील. मनासारखी नोकरी मिळण्यासाठी दगदग करावी लागेल. दिवसभरातील कामांमध्ये बदल करावा लागेल. अचानक बिघडलेली कामे पूर्ण होतील. वादविवादातून सुटका मिळेल. 

मकर – तणाव वाढण्याची शक्यता

ADVERTISEMENT

आज तुमच्या मनात अज्ञात भिती निर्माण होईल. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

ADVERTISEMENT

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

25 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT