मेष – व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता
आज काम सावधपणे करा. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याचे व्यवहार विचारपूर्वक करा. विरोधक तुमच्या पद आणि प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात. शांतपणे तुमचे काम करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोब चांगला वेळ घालवाल.
कुंभ – कंबर दुखी जाणवेल
आज तुम्हाला कंबर अथवा गुडघेदुखी जाणवेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. आत्मविश्वास वाढवा. आर्थिक उन्नती होणार आहे. मेहनत करून कठीण काम पूर्ण करा. को कौंटुबिक वाद संपण्याची शक्यता आहे. कामाचा कंटाळा करू नका.
मीन- नवीन प्रेमसंबध जुळतील
आज एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण वाढेल. विवाहयोग्य मुला-मुलींना योग्य जोडीदार मिळेल. एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल
वृषभ – व्यवसायाचा विस्तार होईल
आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन ओळखींमुळे व्यवसायाचा विस्तार होईल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात मंगल कार्याची तयारी सुरू होईल. रचनात्मक कामात प्रगती होण्याची शक्यता आहे.
मिथुन – नोकरीनिमित्त धावपळ होईल
मनासारखी नोकरी मिळेल मात्र धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागतील. कौंटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
कर्क – नैराश्य येण्याची शक्यता
संशय आणि ताण-तणावामुळे आरोग्य बिघडेल. नैराश्याच्या अधिक जाऊ शकता. व्यावसायिक वृद्धी होऊ शकेल. जुने वाद मिटतील. धोका पत्करू नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रेमसंबधात रोमॅंटिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता.
सिंह – नवीन ओळखी होतील
विवाह ठरवताना अडचणी येतील. नवीन ओळखी होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे आनंदी व्हाल. घरासंबधीचे विषय मार्गी लागतील. रचनात्मक कार्यात रस वाढेल. एखादे नवे काम सुरू कराल. परदेशी प्रवासाचे योग आहेत.
कन्या – व्यवसायात लाभ
व्यावसायिक बदलांमुळे लाभ होईल. नोकरीत चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास वेळेत पूर्ण करावा. राजकारणात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य सुधारेल.
तूळ – खर्च वाढेल
आज तुमचा खर्च नेहमीपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहाकार्य मिळेल. राजकारणात जबाबदारी वाढेल. प्रवास करणे टाळा.
वृश्चिक- आरोग्य सुधारेल
आज तुमच्या आरोग्यात चांगले बदल होतील. तुमचा दिनक्रम नियमित करा. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत ओळख होईल. व्यापारात लाभ आणि नोकरीत प्रमोशन मिळेल. परदेशात प्रवासाचा बेत आखाल. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ आहे. कोणतेही अयोग्य काम करू नका. सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो.
धनु – शेजाऱ्यांशी भांडण होईल
आज तुमचा शेजाऱ्यांसोबत वाद होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या वागण्याचा राग येऊ शकतो. कौंटुबिक जीवनात सावध रहा. आर्थिक स्थिती चांगली होईल. सुख-साधनांमध्ये वाढ होईल. काम वेळेत पूर्ण करा.
मकर- नवीन काम मिळेल
आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा काळ आहे. नवीन नोकरी अथवा व्यवसाय सुरू कराल. नवीन कामात यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल.जमा-खर्चाचा समतोल सांभाळा. धार्मिक कामात रस वाढेल.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम