मेष – वडीलधाऱ्यांच्या मदतीने वाद संपतील. कामाच्या ठिकाणी असलेल्या त्रास देखील कमी होईल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यांत सहभागी व्हाल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी लाभदायक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवा.लहान-सहान शारीरिक दुखणी होण्याची शक्यता आहे.
कुंभ – जुन्या व्यवहारातील अडकलेले पैसे मिळतील.नवीन प्रॉपर्टी ताब्यात येईल. कौटुंबिक जीवन सुखी होईल. वाद करणे टाळा. वातावरणातील बदलांमुळे आजारपण येण्याची शक्यता आहे. कुंटुबात मंगल कार्य घडेल. व्यापारामध्ये वृद्धी होईल.
मीन – अचानक डोकं दुखू लागल्याने चिडचिड वाढेल. मानसिक तणावापासून दूर रहा. मित्रांसोबत फिरायला जाल. जोडीदारासोबत झालेले मतभेद संपतील. कामात यश मिळेल. मानसन्मान वाढेल. विरोधकांपासून सावध रहा.विरोधक अचानक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
वृषभ – कामाचा शोध कराल. वरिष्ठांच्या आश्वासनामुळे बिघडलेली कामे मार्गी लागतील.टीकेला घाबरु नका. कायदेशीर वादात यश मिळेल. नवीन काम करताना संकोच वाटेल. आई-वडीलांकडून धनलाभ होईल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल.एकंदरीत दिवस मात्र समाधानाचा असेल.
मिथुन – आर्थिक सहकार्य मिळाल्याने नवीन कामाला सुरुवात होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नवीन संबंध निर्माण होतील. प्रवास सुखाचा आणि फायद्याचा ठरेल. महत्वाची कामे करताना आळस आणि कंटाळा करू नका.आळस केल्यामुळे यश दूर जाण्याची शक्यता आहे.
कर्क – दिवसभर दगदग करुन देखील यश मिळणे कठीण आहे. कामाच्या ठिकाणी वाद करु नका.सहकारी तुमच्या योजनांच्या आड येण्याचा प्रयत्न करतील. मित्रांसोबत फिरण्याचा बेत आखाल. वावविवादांपासून दूर रहा.
सिंह – कौटुंबिक वाद संपतील.नव्या नातेसंबंधांमधून लाभ मिळेल. यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. पैशांचे व्यवहार करताना सावध रहा. विवाह ठरविण्यात यश येईल. जोडीदारासोबत प्रवास करण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल.
कन्या – जोडीदाराच्या आरोग्यसमस्येमुळे चिंतीत व्हाल. विनाकारण वाद करणे टाळा. आज प्रवास आणि नवीन काम सुरू करू नका. नोकरीत समाधान मिळेल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक सन्मान मिळेल.
तुळ- विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. व्यवसाय आणि नोकरीत चांगले यश मिळेल. करियरमधील प्रयत्न सफळ होतील. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. सहाकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक संबंधांमध्ये तणाव वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक – आज कोणतेही कर्ज घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यांसाठी खर्च करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. लहान-सहान आजारपणे डोकं वर काढतील. शैक्षणिक समस्या मार्गी लागतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
धनु – दीर्घ आजारपणातून मुक्ती मिळेल. आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत. आहाराबाबत सावध रहा. जीवनशैलीमध्ये बदल करा. नवीन योजना सुचतील. महत्वाची कामे मार्गी लागतील. संतानसुख मिळण्याची शक्यता आहे.रचनात्मक कार्यांमध्ये रस घ्या.सन्मान वाढेल.
मकर – कौटुंबिक तणाव आणि व्यावसायिक समस्यांचा सामना करावा लागेल. नात्यातील गैरसमज वाढतील. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. रखडलेली कामे सहज मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक सन्मान मिळेल.