मेष – आज तुम्हाला फ्रेश वाटेल
आज दिवसभर तुम्हाला ताजं आणि उत्साही वाटेल. एखाद्याची भेट फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात बदल करावे लागतील.
कुंभ – युवकांना नव्या नोकरीचा लाभ
आज युवकांना नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. व्यावसायिक उत्पन्न वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याचा योग आहे. आत्मविश्वास वाढेल. देणी-घेणी सांभाळून करा. नोकरीत ध्येय साध्य करण्यात यश मिळेल.
मीन- कर्ज घेताना सावध रहा
आज तुम्हाला कोणतेही कर्ज घेताना सावध राहण्याची गरज आहे. परदेशातील एखादे काम अथवा मुलांवर पैसे खर्च होतील. एखादी अमुल्य वस्तू हरवण्याची शक्यता आहे. शैक्षणिक समस्या कमी होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात रस वाढेल.
वृषभ – गैरसमज वाढण्याची शक्यता आहे
आज तुमच्या कुटुंबात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. कोणतीही चुकीची गोष्ट करू नका. प्रियकरासोबत नाते दूरावण्याची शक्यता आहे. विरोधक व्यावसायिक क्षेत्रात समस्या येतील. कायदेशीर गोष्टींमध्ये सावध रहा.
मिथुन – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
आईला गुडघे दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. आहाराबाबत सावध रहा. मित्रांची मदत मिळेल. व्यावसायिक भागिदारी लाभदायक ठरेल. कागदपत्र सांभाळून ठेवा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल
आज तुमच्यासाठी दिवस आनंदाचा असेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. व्यवसायात बाहेरच्या व्यक्तीमुळे फायदा मिळेल. परदेशी ओळखींमुळे आर्थिक मदत मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
सिंह – परिस्थिती अनुकूल असेल
आज घरातील लोकांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. वैयक्तिक जीवनात चांगल्या गोष्टी घडेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांसोबत जमवून घ्या. धार्मिक कार्यात रस वाढेल. रचनात्मक कार्यात सामाजिक लोकप्रियता वाढेल.
कन्या – चांगली संधी गमवाल
दुर्लक्षपणा आणि आळस केल्यामुळे चांगली संधी गमवाल. अती शिस्तीमुळे घरातील तरूणांचा संघर्ष वाढेल. देणी घेणी सांभाळून करा. काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण वाढेल. प्रेमात अपयश मिळेल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील.
तूळ – जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल
आज तुम्हाला भाग्याची उत्तम साथ मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मनातील ईच्छा पूर्ण होतील. जीवनसाढी आणि मुलांकडून उत्तम लाभ होईल. व्यावसायिक यात्रा लाभदायक ठरेल. मनातील सुप्त ईच्छा पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांंसाठी अनुकूल वातावरण असेल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील
कामाच्या ठिकाणी आज तुमची आव्हाने वाढतील. दुर्लक्षपणा आणि आळस करू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यवसायात राजकारणातील ओळखीचा फायदा होईल. पैशांसबंधीत चांगली बातमी मिळेल. घरातील वृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.
धनु – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज अती परिश्रम आणि दगदग केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. दिनक्रम नियमित चालू ठेवा. सुर्य नमस्कार केल्याने उत्साही वाटेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. काम वेळेत पूर्ण होतील.
मकर- जोडीदारासोबत फिरायला जाण्याची शक्यता
आज तुम्हाला सर्व बाजूने आनंद मिळेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. मानसिक शांतता मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला मदत करतील. व्यवसायात लाभ मिळेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी