ADVERTISEMENT
home / भविष्य
29  मे 2019 राशीफळ, मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा

29 मे 2019 राशीफळ, मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा

मेष – आरोग्य सुधारेल

बिघडलेली तब्येत हळूहळू सुधारेल. आहाराबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात अप्रत्यक्षरित्या लाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात प्रगती होईल. खर्चावर नियंंत्रण ठेवा. कठीण कामे सहज पूर्ण कराल. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल.

वृषभ – नातेवाईकांकडून सहकार्य मिळणार नाही

आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून सहकार्य मिळणार नाही. नवीन नातेसंबधात तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायात लवकर लाभ मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होईल. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात मन रमवाल.

मिथुन – पोट अथवा डोळ्याच्या समस्या होऊ शकतात

आज तुम्हाला डोळे अथवा पोटाच्या समस्या जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी अस्थिरता जाणवेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. वादविवाद करणे टाळा. व्यावसायिक संबधांमध्ये तणाव जाणवेल. कुटुंबात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा.

कर्क – एखादी महागडी वस्तू खरेदी कराल

घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. रखडलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक संबध मजबूत होतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. धार्मिक कार्यात मन रमवाल. शैक्षणिक समस्या सुटतील. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.

ADVERTISEMENT

सिंह – नवीन संबध दृढ होतील

जोडीदाराच्या भावना समजून समस्या दूर करा. ज्यामुळे जीवन सुखी आणि समाधानी होईल. नवीन लोकांच्या ओळखी लाभदायक ठरतील. दिलेले पैसे परत मिळतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येईल. देणी-घेणी सुधारतील.

कन्या – नोकरीत समस्या येतील

आज पूर्ण दिवस दगदगीचा राहील. नोकरीतील समस्या त्रास देतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवावे. कामाच्या अतीताणामुळे शारीरिक त्रास जाणवेल. थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण कराल.

तूळ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ऑफिशिअल पार्टीत जाणे लाभदायक ठरेल. शिक्षण आणि कला क्षेत्रातील लोकांना फायदा होईल. मनात सुखशांतीची भावना निर्माण होईल. सुखसाधने वाढतील. वातावरणातील बदलांमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – शैक्षणिक क्षेत्रात समस्या येतील

विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी  अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. विनाकारण दगदग करावी लागेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. धार्मिक कामात रस वाढेल.

ADVERTISEMENT

धनु – गुडघे आणि पायदुखी होईल

आज तुम्हाला गुडघे अथवा पायाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आहाराबाबत आणि दैनंदिन कामे करताना सावध रहा. गोड बोलून सामाजिक मानसन्मानात वाढ कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मकर – नवीन संबध निर्माण होतील

आज तुमच्या जीवनात एक प्रिय व्यक्तीचे आगमन होणार आहे. भाऊ अथवा शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन ओळखी निर्माण करताना सावध रहा. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात समस्या येतील.

कुंभ – नवीन योजना निर्माण होतील

विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन ओळखी वाढतील. हरवलेला विश्वास परत मिळेल. प्रेमसंबध सुधारतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी कराल.

मीन – कुटुंबात आनंदाचे वातावरण मिळेल

आज आनंदाचे आणि सुखसमाधानाचे वातावरण असेल. कुटुंबात आनंदवार्ता मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पुर्ण कराल. विरोधक प्रशंसा करतील. व्यवसायात लाभ मिळेल. आरोग्याची काळजी  घ्या. रचनात्मक कार्यात यश मिळेल.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

27 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT