मेष : कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता
खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात यश मिळेल.
कुंभ : कठोर परिश्रम घ्यावे लागतील
इच्छित नोकरीसाठी धावपळ होईल. ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. आपले उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमप्रकरणाची नवी सुरुवात होण्याची शक्यता. आर्थिक खर्च वाढू शकतो.
मीन : थकवा जाणवेल
धावपळीमुळे आज तुम्हाला थकवा जाणवेल. चिडचिडेपणा राहील. आत्मविश्वास कमी होईल. व्यावसायिक जबाबदारी वाढू शकतात. अपत्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत वाढतील.
वृषभ : नोकरीचा शोध संपुष्टात येईल
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरीचा शोध संपुष्टात येईल. मुलाखतीत तुम्हाला यश मिळेल. व्यवसायाच्या योजना पूर्ण होतील. नवीन कंत्राटे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
(वाचा : राशीनुसार निवडा तुमचे करिअर)
मिथुन : मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक कुठेतरी जाण्याची योजना आखली जाऊ शकते. सामाजिक आदर आणि संपत्ती वाढ होईल.
कर्क : जुन्या आजारापासून मुक्तता
जुन्या आजारापासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक राहील. नियमित दिनक्रम आणि सूर्यस्ना काळजीपूर्वक करा. आत्मविश्वासात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. मित्रांचं सहकार्य लाभेल.
सिंह : मित्र माघार घेतील
गरजेच्या क्षणी ऐन वेळेस मित्र माघार घेतील. वैयक्तिक संबंधांना वेळ द्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रात फायदा मिळू शकतो. कायदेशीर निर्णय आपल्या बाजूने असतील.
(वाचा : या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी)
कन्या : डोळ्यांना त्रास होऊ शकतो
डोळेदुखी किंवा डोकेदुखीमुळे त्रास होऊ शकतो. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक केलं जाईल. रचानत्मक कामांमध्ये आवड निर्माण होऊ शकते
तूळ : महागडी भेटवस्तू मिळू शकते
आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदी असेल. आपल्याला भेटवस्तूमध्ये एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकते. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल आणि उत्पन्न वाढेल.
वृश्चिक : विवाहचा योग आहे
अविवाहितांसाठी वेळ अनुकूल आहे. विवाहचा योग आहे. एखादी गोष्ट मनात ठेवू नका. प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
(वाचा : कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या)
धनु : वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे.रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आर्थिक परिस्थिती असमाधानकारक राहील.
मकर : मालमत्ता खरेदीची योजना
जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. खर्च कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. त्वरित नफ्यासाठी तडजोड करण्यास तयारी असू शकते. पालकांची विशेष काळजी घ्या.