ADVERTISEMENT
home / भविष्य
3 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

3 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

मेष –  मित्रांशी बोला मन प्रसन्न राहील

आज मित्रांशी बोलल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. घरात राहून कुटुंबासोबत तुमचे जुने छंद जपण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांच्या भावना समजून घेण्यासाठी चांगली संधी आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रवास करणे मात्र आता पूर्णपणे टाळण्याची गरज आहे. 

कुंभ – पैशांबाबत आनंदवार्ता मिळणार आहे

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी आनंदवार्ता मिळणार आहे. कुटुंबासोबत कॅंडल लाईट डिनर कराल. वाहन चालवताना सावध राहा. देणी घेणी सांभाळून करा. 

ADVERTISEMENT

मीन-  अज्ञात भिती जाणवणार आहे

आज तुम्हाला एखादी अज्ञात भिती जाणवणार आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. घरात राहून नाती मजबूत करा. मित्रांसोबत फोनवर संपर्क साधा. रखडलेली कामे जलदगतीने पूर्ण होतील. 

 

वृषभ – व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता

ADVERTISEMENT

आज व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. लहान सहान समस्या डोके वर काढू शकतात. कौटुंबिक समस्या दूर होतील. रखडलेली कामे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मिथुन –  आर्थिक लाभ होण्याची शक्यता 

आज एखाद्या नव्या योजनेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सध्या घरात कोणतेही नवीन काम सुरू करू नका. कुटुंबाच्या सोबत राहा. मित्रांपासून दूर राहणे फायद्याचे ठरणार आहे. प्रवासाला जाणे सध्या टाळलेलेच बरे राहील. 

कर्क –  कामे रद्द होण्याची शक्यता 

ADVERTISEMENT

पर्यटनशी निगडीत व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीत समस्या येऊ शकतात. कोर्ट कचेरीतील नियमांचे पालन करा. वाद घालणे सध्या टाळलेलेच बरे राहील. कुटुंबासोबत नाती मजबूत होतील.  

सिंह – आरोग्याची जास्त काळजी घ्या

आज तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहा. बाहेरगावी जाण्याची योजना सध्या स्थगित करावी लागेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रिय व्यक्तीपासून कदाचित दूर राहावे लागेल. 

कन्या – कौटुंबिक वाद टाळा

ADVERTISEMENT

आज कौटुंबिक वाद टाळणेच योग्य राहील. कुटुंबासोबत मौजमस्ती करण्याचा काळ आहे. राजकारणातील सहयोग वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन चालवणे सध्या टाळा. सामाजिक कार्यात सहभागी होणे टाळावे लागेल. 

 

तूळ –  शैक्षणिक कार्यात प्रगती होईल

आज तुमची शैक्षणिक कार्यात चांगली प्रगती होणार आहे. उत्पन्नाची साधने मिळतील. व्यवसायातील योजना सफळ होतील. महत्त्वाची कामे सर्वात आधी करा. कुटुंबासोबत मौजमस्तीचे वातावरण असेल. 

ADVERTISEMENT

वृश्चिक – आर्थिक संकट येण्याची शक्यता 

आज तुमच्यावर एखादे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळलेलेच बरे राहील. लहान सहान समस्यांमुळे मनात भिती निर्माण होऊ शकते. घरात राहील्यामुळे कौटुंबिक नाती मजबूत होतील. जुने छंद पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न करा. 

धनु – आरोग्य उत्तम असेल

आज तुमच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे आरोग्य सुधारणार आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्यांचा सामना करावा लागेल. उत्साहात वाढ होणार आहे. 

ADVERTISEMENT

मकर –  प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल

आज तुमची तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत भेट होणार आहे. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. घराबाहेर न पडणेच योग्य राहील. 

31 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT